राहुलकुमार अवचट
Yavat News : यवत : सिमेंट वाहतूक करणाऱ्या भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पाटस (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीतील श्री सिमेंट कंपनीच्या जवळ घडली आहे.
श्री सिमेंट कंपनी जवळ घडला अपघात
यश शंकर जगताप (वय २३ रा. हातवळण- जगताप मळा, ता. दौंड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर पोपट मुक्ताजी खारतोडे ( रा. बेटवाडी ता. दौंड) असे गुन्हा दाखल झालेल्या चालकाचे नाव आहे. याप्रकरणी (Yavat News) दीपक शिवाजी जगताप यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोपट खारतोडे हे त्यांच्या ताब्यातील टेम्पो घेऊन शुक्रवारी (ता.१) भरधाव वेगाने चालले होते. (Yavat News) श्री.सिमेंट कंपनीच्या प्लांटकडून मेन गेटकडे टेम्पो घेऊन जात असताना, त्यांच्या टेम्पोने कंपनीकडे जाणाऱ्या एका दुचाकीला जोरदार धडक दिली.
दरम्यान, या अपघातात दुचाकीवरील यश जगताप हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. (Yavat News) उपचारादरम्यान यश जगताप यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी दीपक जगताप यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार टेम्पो चालक
पोपट खारतोडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Yavat News : पुणे-सोलापूर महामार्गावर सहजपूर येथे टेम्पो व ट्रेलरची धडक होऊन अग्नीतांडव
Yavat News : पुणे – सोलापूर महामार्ग ओलांडताना दुचाकीने दिलेल्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू