राहुलकुमार अवचट
Yavat News : यवत, (पुणे) : यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गलांडवाडी (ता. दौंड) येथे एका ४३ वर्षीय व्यक्तीने ग्राइंडरच्या साह्याने गळा कापून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. (सोमवारी (ता. २४) मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास हि घटना उघडकीस आली आहे.
यवत पोलिसांकडून तपास सुरू
विपुल रमेश गर्दे (वय ४३ रा. गलांडवाडी, ता. दौंड, मूळ रा. कर्जन, ता. कर्जन, जिल्हा बडोदा, राज्य गुजरात) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी प्रमोद तुळशीराम शेलार यांनी यवत पोलिसांना जबाब दिला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गलांडवाडी येथील प्रमोद शेलार यांच्या घरालगत असलेल्या खोलीमध्ये सोमवारी दोनच्या सुमारास विपुल गर्दे राहत असलेल्या ठिकाणी खडबड आवाज येत असल्याने तुळशीराम शेलार हे पाहण्यासाठी गेले होते. यावेळी विपुल गर्दे याने ग्राइंडरच्या साह्याने गळा कापल्याचे दिसून आले (Yavat News) तसेच रक्ताचे थारोळयात पडल्याचे दिसून आले.
सदर घटनेची माहिती यवत पोलिसांना दिली असता तात्काळ यवत पोलीस घटनास्थळी दाखल होत विपुल गद्रे यांना यवत ग्रामीण रूग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. (Yavat News) मात्र डॉक्टरांनी विपुल गर्दे हे उपचारपुर्वीच मयत झाल्याचे सांगितले आहे. पुढील तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मदने हे करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Yavat News : यवतमध्ये वृद्धाला भरदिवसा लुटले ; दोन तोळे वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या केल्या लंपास
Yavat News : यवत येथे श्री महालक्ष्मी माता आषाढ यात्रेची सात काढून सांगता