Yavat News : यवत : दौंड तालुक्यातील सहजपूर फाट्यावरील पंजाबी ढाब्यासमोर रस्त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या ट्रेलरला पाठीमागून आलेल्या केमिकलने भरलेल्या आयशर टेम्पोने (क्र. एम. एच १३ सी. यू ४१४७) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास जोरदार धडक दिली. यामुळे मोठा स्फोट होऊन, टेम्पो व ट्रेलर या दोन्ही वाहनांनी पेट घेतला. प्रसंगावधान राखून, दोन्ही वाहनांमधील चालकांना परिसरातील नागरिकांनी सुखरूप बाहेर काढले.
दोन्ही वाहनांमधील चालकांना सुखरूप बाहेर काढले
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आयशर टेम्पोमध्ये केमिकल भरले होते. या टेम्पोची ट्रेलरला जोरदार धडक बसल्यामुळे केमिकलने पेट घेतला. (Yavat News ) दरम्यान, केमिकल रस्त्यावर पडल्यामुळे पंजाबी ढाब्यावर उभ्या असलेल्या आणखी एका गाडीने पेट घेतला.
घटनेची माहिती मिळताच पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले. (Yavat News ) यानंतर दौंड नगरपरिषदेची अग्निशमन गाडी व वाघोली पीएमआरडीएची अग्निशमन गाडी घटनास्थळी दाखल झाली. अग्निशामक दलाच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.
या वेळी रस्त्यावर जवळपास ३ किलोमीटर वाहनांची रांग लागली होती. यवत पोलीस स्टेशनचे अधिकारी, उपनिरीक्षक उत्तम कांबळे, उपनिरीक्षक मदने, पोलीस हवालदार दत्ता काळे, निलेश कदम, रविंद्र गोसावी, संतोष कदम, विजय आव्हाळे, पालखे, (Yavat News ) पोलीस पाटील गणेश वेताळ, सहजपूर येथील ग्रामस्थ, राजधानी ग्रुपचे सदस्य, माकर वस्तीचे युवक घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. स्थानिक नागरिकांनी सहकार्याने त्यांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Yavat News : पुणे – सोलापूर महामार्ग ओलांडताना दुचाकीने दिलेल्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू
Yavat News : यवत येथे थांबलेल्या एसटीला कार धडकून अपघात; प्रवासी बालंबाल बचावले