राहुलकुमार अवचट
यवत : यवत, (पुणे) : दारू पिऊन आरडाओरडा करून सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातल्या प्रकरणी तिघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोरीपार्धी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील हॉटेल जयमल्हारसमोर बुधवारी (ता. ०७) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. (A case has been registered against two people from Loni Kalbhor in Yawat police station for creating a disturbance by drinking alcohol in a public place.)
हॉटेल जयमल्हारसमोर घातला गोंधळ
उमेश उत्तम मालपाणी (वय – २८) भालचंद्र मनोहर पवार (वय -४५ दोघेही रा. खोकलाई चौक, लोणीकाळभोर ता. हवेली) व अमित अशोक पवार (वय ३३ रा. बोरीपार्धी ता. दौंड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत.
याबाबत सहायक पोलीस उपनिरीक्षक हनुमंत जाधव यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Yavat News ) पुढील तपास यवत पोलीस नाईक चोरमले हे करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Yavat News : पैशाच्या कारणावरून वरवंड येथे एकाचा खून, आरोपीला तात्काळ ठोकल्या बेड्या
Yavat News : संत तुकाराम महाराज पालखी सेवामार्गाची दुरावस्था, गावकऱ्यांची दुरुस्तीची तात्काळ मागणी
Yavat News : कार्यकर्त्यांच्या पाठबळावर भाजपा दौंड तालुक्यात उभारी घेत आहे : आमदार राहुल कुल