Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘शांतला’ चित्रपटातून लेखक, दिग्दर्शक पंकज यादव यांची बॉलिवूडमध्ये दमदार एंट्री

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 13 December 2023, 12:56

विजयकुमार गायकवाड

इंदापूर : सामान्य कुटुंबातून खडतर प्रवास करत सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कात्रज या छोटयाशा गावातील लेखक, दिग्दर्शक पंकज पांडुरंग यादव यांनी जिद्द व मेहनतीच्या जोरावर बॉलिवूड चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. त्यांचा ‘शांतला’ हा चित्रपट संपूर्ण देशभरात हिंदी, मराठी, तेलगु, तमिळ, कन्नड, मल्याळम या पाच भाषांमध्ये १५ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे मराठी भाषेतील संवाद पंकज यादव यांनी लिहिले आहेत. यादव यांच्या यशाचा डंखा देशभरात वाजत आहे.

दरम्यान, मुंबईतील अंधेरी येथे ११ डिसेंबर रोजी या चित्रपटाचा ट्रेलर व गाणे रिलीज करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात हिंदी चित्रपट सृष्टीतील नामवंत दिग्दर्शक महेश भट्ट हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दिग्दर्शक महेश भट्ट यांनी सर्व भाषेतील ट्रेलर पाहिले. या संपूर्ण सोहळ्यामध्ये त्यांना मराठी भाषेतील ट्रेलर आवडल्याचे त्यांनी सांगितले तसेच त्यांनी पंकज यादव यांच्या लिखाणाचे भरभरून कौतुक केले.

 

दिग्दर्शक, लेखक पंकज यादव हे सध्या मालिका दिग्दर्शन क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या ते क्राईम पेट्रोल या मालिकेचे सह दिग्दर्शक म्हणून काम करत आहेत. त्यांनी आतापर्यंत मन उडू उडू झाले, जय जय स्वामी समर्थ, सावधान इंडिया, सुंदरा मनामध्ये भरली, क्रिमिनल्स, क्राईम अलर्ट अशा विविध मालिकांचे सहाय्यक व सह दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. आधारवड, बापाच्या लग्नाला विघ्न हजार, या मराठी चित्रपटांना व प्लेज टू प्रोजेक्ट या हिंदी चित्रपटाला त्यांनी सह दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. वेस्टन, हत्या की आत्महत्या, वेळ या लघुपटाचे त्यांनी दिग्दर्शन व लेखन केले असून, वेस्टन या लघुपटाची निवड ‘पुणे इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवल’साठी झाली आहे. महाराष्ट्रातील गुन्हेगारी क्षेत्रावर आधारित कलम-३०२ या वेब सिरीजचे लेखन व दिग्दर्शनही त्यांनी केले आहे.

दरम्यान, कोरोना महामारीच्या काळात या आजाराबद्दल नागरिकांचे अनेक गैरसमज झाले होते. हे गैरसमज दूर करण्यासाठी त्यांनी विविध व्हिडिओ बनवले. याची दखल ‘हाय रेंज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’ने घेऊन त्यांना सन्मानित केले.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून नागरिकांना मिळाले ‘सरप्राईज गिफ्ट’; हरवलेले पावणे चार लाखांचे मोबाईल शोधून केले परत…

Saturday, 4 July 2026, 13:09

दौंड येथे घरात घुसून हिंदू तरुणीचे अपहरण! कमरुद्दीनने कुटुंबीयांना मारहाण करून तरुणीला ओढत नेलं, 5 लाखांची रोकड आणि 7 तोळे सोनंही केले लंपास; 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:59

लग्नानंतरचा छळ असह्य! माहेरून 3 लाख रुपये आणण्याची सक्ती; विवाहितेची पतीसह पाच जणांविरुद्ध तक्रार दाखल

Saturday, 4 July 2026, 12:26

तोबरेवस्तीत गाभण शेळ्या, बोकडांची चोरी; शेतकऱ्याचे 35 हजारांचे नुकसान

Saturday, 4 July 2026, 12:16

केडगावमध्ये दांपत्यावर जीवघेणा हल्ला; मारहाण करून मंगळसूत्र, दागिने आणि मोबाईल केला लंपास

Saturday, 4 July 2026, 12:09

पुणे–सोलापूर महामार्गावर राडा! पिकअप आडवी लावून एसटी चालकाला मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:02
Next Post

विठ्ठलाच्या प्रसादाचा लाडू सुकण्यासाठी कळकट ताडपत्रीचा वापर, धक्कादायक अहवालात नेमक काय म्हटलयं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.