भिगवण (पुणे) दि.20: अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जगप्रसिद्ध रत्नागिरी व देवगड हापूस आंब्याच्या 10 पेट्या दाखल झाल्या आहेत. यावेळी आंबा पेटी पूजनाचा कार्यक्रम ज्योती समूहाचे चंद्रशेखर पवार व दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामदास झोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच पार पडला.
ग्रामीण भागामध्ये सर्वात प्रथम भिगवन येथील हापुस आंबा व्यवसायिक संतोष सोनवणे यांच्या आंबा स्टॉल वर हापुस आंबा दाखल झालेला आहे. गतवर्षीच्या तुलनेत नोव्हेंबर पर्यंत पडत असलेल्या पावसामुळे जमिनीमध्ये ओलावा राहिला याचाच परिणाम पालवी उशिरा फुटली व मोहर प्रक्रिया एक महिना उशिरानंतर सुरू झाली. त्यामुळे साहजिकच हापूस आंब्याचा हंगाम हा गतवर्षी पेक्षा एक महिना लांबल्याने खवय्यांचा मोठ्या प्रमाणात हिरमोड झाल्याचे मागील काही दिवसांमध्ये पहावयास मिळत होते.
हापूस आंब्याची 1 पेटी 13 हजारांना विकली..
कोकणातील रत्नागिरी (गणपतीपुळे) येथील आंबा बागायतदार विद्याधर पुसाळकर यांनी खूप मेहनतीने नैसर्गिक आपत्तीला तोंड देत सेंद्रिय पद्धतीने दर्जेदार हापुस आंबा भिगवण व भिगवन पंचक्रोशीतील हापूस प्रेमींसाठी उपलब्ध करून दिला आहे. चालू वर्षाचा हापूस आंब्याचा हंगाम हा फक्त दोन महिन्याचा असणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. तसेच हापूस आंब्याला दरही चांगल्या प्रमाणात राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी पहिली हापूस आंब्याची पेटी चंद्रशेखर पवार यांनी तब्बल 13 हजार रुपयांना खरेदी केली तर दुसरी पेटी दत्तकला शिक्षण संस्थेचे रामदास झोळ यांनीही 13 हजार रुपयाला खरेदी केली. तिसरी पेटी सराफ व्यावसायिक सुरेश पिसाळ यांनी 13 हजारांमध्ये खरेदी केली. चौथी पेटी विजयसिंह यांनी 13 हजार रुपयाला खरेदी केली.
यावेळी चंद्रशेखर पवार, रामदास झोळ, सुरेश पिसाळ, बापूराव थोरात, अशोकराव शिंदे, भरत मल्लाव, तुषार शिरसागर, आकाश पवार, संपतराव बंडगर, सचिन बोगावत, संदीप वाकसे, दादासाहेब थोरात, नितीन चितळकर, केशव भापकर, शरद चितारे, आप्पासाहेब गायकवाड, योगेश चव्हाण, प्रवीण वाघ, रियाज शेख, जावेद शेख, सतीश वायसे, अल्ताफ शेख, विजय सिंग, उमेश थोपटे, सागर जगदाळे, सागर घरत, निलेश मोरे, चैतन्य बंडगर, ओम बंडगर, अक्षय एकाड, सागर सोनवणे, रोहन देशमुख, शंकर जाधव, व इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर प्रशांत चवरे यांनी केले.