इंदापूर (पुणे) : तालुक्यातील निमसाखर येथील एन. ई. एस. हायस्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज याठिकाणी आंतराष्ट्रीय योग दिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी इंदापूर पंतजली योग समितीचे योगशिक्षक तहसिल युवा प्रभारी सचिन पवार व महिला योगशिक्षिका प्रज्ञा पवार यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना योगप्राणायमाचे प्रात्यक्षिके दाखवून योगप्राणायम करवून घेतला. तसेच हायस्कूलच्या शिक्षकांनी सुमधूर अशा भजनाच्या गायनावर विदयार्थ्यांचे टाळ्यांच्या गजरात अँकयुप्रेशर करवून घेतले.
यावेळी शाळेतील अनेक विद्यार्थ्यांसह पालक व शाळेचे शिक्षक, कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विद्यालयाचे सचिव धनंजय रणवरे, विभाग प्रमुख चंद्रकांत बोंद्रे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान प्राचार्य सी. जी. रणवरे यांनी उपस्थितांचा यथोचित सन्मान केला व अनुराधा रणवरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.