विशाल कदम
Loni Kalbhor : लोणी काळभोर : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये ‘वर्ल्ड पेशंट सेफ्टी डे’ विविध सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये प्रदर्शन, नाटक व मार्गदर्शन यांसारखे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन दिशा क्वालिटी व नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचे वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून लेफ्टनंट कर्नल डॉक्टर गिरीष माढेश्वरी उपस्थित होत्या.
दरम्यान, रुग्णांना सुरक्षित ठेवणे आणि त्यांच्या बऱ्या करता येण्याजोग्या आरोग्य समस्या किंवा रोग बरे करणे, हे डॉक्टरांचे कर्तव्य आहे. मात्र, आजच्या काळात औषधांच्या हेराफेरीमुळे ना रुग्ण सुरक्षित आहे ना डॉक्टरांना आपले कर्तव्य बजावता येत आहे. (Loni Kalbhor ) प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी आजारी पडतो आणि अशावेळी त्याच्यासाठी औषधे खूप महत्त्वाची असतात. विशेषत: कोविडची साथ आल्यानंतर औषधांमध्ये मोठ्या प्रमाणात फसवणूक आणि चुका दिसून येत आहेत. अशा धोक्यांची रुग्णांना जाणीव करून देण्यासाठीच जागतिक रुग्ण सुरक्षा दिन साजरा केला जातो.
यावेळी विश्वराज हॉस्पिटलचे डॉ. सचिन काटकाडे, डॉ. पल्लवी टिळेकर, डॉ. दीप्ती गायकवाड, डॉ. अनिरुद्ध गरुड डॉ. विजय खंडाळे, ज्योती वर्गीस, रीना चव्हाण, हॉस्पिटलचे कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.(Loni Kalbhor ) या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा डेंगळे आणि राहुल कांबळे यांनी केले.
…तर कर्मचाऱ्यांना तणावमुक्त होऊन सेवा करता येते
यावेळी बोलताना गिरीष माढेश्वरी म्हणाले की, रुग्णालयात दाखल झाल्यानंतर अपगर (APGAR) बघणे आवश्यक आहे. यात रंग, ह्दयगती, प्रतिझेप, स्नायूटोन श्वास या पाच गोष्टीकडे लक्ष तज्ज्ञांनी बघावे. वैद्यक तज्ज्ञ आणि पॅरामेडिकल स्टाफ यांच्या उपलब्धतेवर रुग्णसेवा बरीच अवलंबून आहे. (Loni Kalbhor ) मुबलक कर्मचारी असले की, कर्मचाऱ्यांना तणावमुक्त होऊन सेवा करता येते. याचा सकारात्मक परिमाण दिसतो.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Loni Kalbhor News : महाराष्ट्र केसरीच्या दहीहंडीला “गौतमी पाटील” थिरकणार..