पुणे : जगातील प्रसिद्ध भविष्यकारांपैकी एक असलेले बल्गेरियन भविष्यकार बाबा वेंगा यांनी २०२३ या नवीन वर्षासाठी एक भविष्यवाणी केली आहे. ही भविष्यवाणी ऐकून भारतीयांसह जगाची झोप उडाली आहे.
बाबा वेंगा यांनी आत्तापर्यंत २०२२ सालाबाबत केलेले दोन अंदाज खरे ठरले आहेत. बाबा वेंगाच्या भविष्यानुसार २०२३ हे वर्ष भारतासाठी कसे असेल आणि काही घडणार आहे ते सांगितले आहे. बाबा वेंगा यांनी २०२३ मध्ये भारतात सौर त्सुनामी येण्याची शक्यता वर्तवली आहे.
त्यामुळे लोकांचे आणि पैशाचे मोठे नुकसान होणार आहे. याशिवाय आशिया खंडातील अणुऊर्जा प्रकल्पात स्फोट होणार असून त्याचा परिणाम भारतावरही होणार आहे.
दरम्यान, बाबा वेंगा हे बल्गेरियाचे रहिवासी असून त्यांचा जन्म ३ ऑक्टोबर १९११ रोजी झाला आहे. त्यांचे खरे नाव वांगेलिया पांडेवा गुश्तारोवा होते. पुढे ते बाबा वेंगा म्हणून प्रसिद्ध झाले. वयाच्या १२ व्या वर्षी त्यांच्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेली होती. बाबा वेंगा यांनी संपूर्ण आयुष्य बल्गेरियातील कोझुह पर्वताच्या रुपीट प्रदेशात व्यतीत केले आहे. बाबा वेंगा यांनी ११ ऑगस्ट १९९६ रोजी जगाचा निरोप घेण्यापूर्वी बाबा वेंगा यांनी ५०७९ पर्यंतचे भाकीत केले आहे.
बाबा वेंगाच्या २०२३ च्या महत्वपूर्ण दोन भविष्यवाणी
१) एक विनाशकारी सौर वादळ येईल. यादरम्यान सूर्यातून निघणाऱ्या ऊर्जेच्या स्फोटातून निघणारी धोकादायक किरणे पृथ्वीवर पडतील, जी अब्जावधी अणुबॉम्बसारखी विनाशकारी असू शकतात.
२) पृथ्वीवर एक मोठी खगोलीय घटना घडणार आहे. या घटनेच्या प्रभावामुळे पृथ्वीच्या कक्षेत बदल होणार आहेत. ज्याचा परिणाम अत्यंत घातक असेल. खूप मोठ्या संख्येने लोक मारले जातील.
(टीप : वरील सर्व बाबी पुणे प्राईम न्यूज केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यामध्ये पुणे प्राईम न्यूज कोणताही दावा करीत नाही.)