शिक्रापूर : रांजणगाव एमआयडीसी (ता.शिरुर) येथील झामील स्टील कंपनीमध्ये क्रेनच्या साहाय्याने मोठमोठे पार्ट उचलत असताना क्रेनचे हूक तुटून पार्ट अंगावर पडल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला. शिवबाबू कमलेश शाहू (वय २३, सध्या रा. ढोकसांगवी, ता. शिरूर) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याबाबत राजेश बुधानी शाहू (वय ३४, रा. ढोकसांगवी, ता. शिरूर) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
सदर कंपनीमध्ये शिवबाबू शाहू हा क्रेनच्या सहाय्याने लोखंडी पार्ट उचलत असताना अचानक क्रेनचे हुक तुटून लोखंडी पार्ट शिवबाबूच्या छातीवर पडून शिवबाबू पाठीमागे असलेल्या पार्टमध्ये अडकला गेला. दरम्यान अन्य कामगारांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलवले. मात्र, उपचारापूर्वीच शिवबाबूचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.