Pune News : पुणे : राज्यातील कुस्ती प्रेमींना (Wrestling lovers)आणि प्रेक्षकांना पुरुषांनंतर आता महिलांच्या कुस्त्या पाहता येणार आहेत. नुकतीच महिलांचीही आता प्रथमच महाराष्ट्र केसरी स्पर्धा रंगणार अशी घोषणा (announced) करण्यात आली आहे. तसेच ती स्पर्धा (competition) पुण्यात होणार असल्याचेही जाहीर करण्यात आले होते. मात्र आता ही स्पर्धा पुण्यात होणार का ? तसेच ही स्पर्धा खरी असणार असा प्रश्न उपस्थित झाला असून महिलांची महाराष्ट्र केसरी (Women’s Maharashtra Kesari) स्पर्धा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
पुण्यात कुस्तीगीर महासंघाच्या अस्थायी समितीने १ ते ७ एप्रिलला स्पर्धा घेण्याची घोषणा केली असताना तर कुस्तीगीर परिषदेने सांगलीत 23 व 24 मार्चला स्पर्धा होणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे वादाच्या भोवऱ्यात ही स्पर्धा सापडली आहे, परंतु खरी स्पर्धा कोणती, यासंदर्भात दावा स्पर्धा समितीचे अध्यक्ष संदीप भोंडवे यांनी केला आहे.
महिलांची महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार पुणे व सांगली दोन्ही शहरात रंगणार आहे. परंतु पुण्यातील स्पर्धा खऱ्या आहेत. त्यालाच भारतीय कुस्तीगिर महासंघाची मान्यता मिळाली आहे, असा दावा संदीप भोंडवे यांनी केला आहे. या स्पर्धेच्या आयोजिका शिवसेना नेत्या दिपाली सय्यद आहे. पुणे येथी विजेत्यांना स्कूटी, आल्टो गाडीचे मिळणार बक्षीस आहे.
राज्यात पुरुषांप्रमाणेच महिलांसाठीही महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय झाला आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी यासंदर्भात घोषणा केली. महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील विजयी महिला कुस्तीगीरास महिला केसरी ‘किताब आणि चांदीची गदा देऊन गौरविण्यात येणार आहे.
दरम्यान, या स्पर्धेतील विजेत्यांना राष्ट्रीय पातळीवर संधी मिळणार आहे. परंतु सांगलीची स्पर्धा अधिकृत नाही. त्यामुळे त्यातील विजेत्यांना सरळ संधी मिळणार नाही. त्यांनी पुणे येथील स्पर्धेत सहभाग घेतल्यानंतरच त्यांना ही संधी मिळू शकेल, असा दावा संदीप भोंडवे यांनी केला. त्यामुळे स्पर्धकांपुढे आता पेच निर्माण होण्याची शक्यता होणार असल्याचीही चर्चा रंगली आहे.
Sports News | खराडी गावात रंगणार कुस्त्यांचा आखाडा