राहुलकुमार अवचट
( Women’s Day Special ) यवत : देशात सर्वत्र ८ मार्च हा जागतिक महिलादिन म्हणून साजरा केला जात असताना दौंड तालुक्यातील यवत येथील महालक्ष्मी प्रतिष्ठान संचलित किलबिल बालक मंदिर येथे संस्थेच्या वतीने महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक किलबिल बालक मंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका सुवर्णा दौंड यांनी केले.
“ती आहे म्हणून सारे विश्व आहे, ती आहे म्हणून सारे घर आहे ! ती आहे म्हणून सुंदर नाती आहे, ती आहे म्हणून नात्यांमध्ये प्रेम आहे !! यासह “ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊचा शिवबा झाला”, “ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताई चा ज्ञानेश्वर झाला”, “ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला”, आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला “, आदी वाक्यांचा संदर्भ देतो उपस्थित महिलांना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
पाल्यांना संस्कारांसोबतच निसर्गाविषयी प्रेम निर्माण व्हावे व निसर्गाप्रती उत्तरदायीत्वाची जाणीव व्हावी म्हणूनच गिफ्ट अ प्लांट या संकल्पनेतून विद्यार्थी आत्ता पासून त्यांच्या जन्मदिनी त्यांच्या घरी, शाळेत, बागेत एक झाड लावावे, झाडांना व पक्ष्यांना पाणी देण्याची सवय मातांनी आपल्या मुलांना लावावी अशी विनंती शाळेच्या वतीने करण्यात आली.
किलबिल बालक मंदिर येथे संस्थेच्या वतीने महिला दिनाचे आयोजन…
यावेळी विविध पारंपारिक खेळांचे आयोजन करण्यात आले होते, जागतिक महिनादिनानिमित्त सोनाली करडे, मेहराज शेख, रूपाली शेळके, गौरी काळे ,प्राजक्ता शिंदे, या महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी नारीशक्ती म्हणून सन्मान केल्याबद्दल त्यांनी संस्थेचे हार्दिक असे ऋण व्यक्त केले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद शाळेच्या माजी मुख्याध्यापिका लता जगताप या उपस्थित होत्या .
जागतिक महिला दिनाचा संपूर्ण इतिहास महिलांना सांगितला तसेच आज आपली संस्कृती ही पाश्चिमात्य देशांच्या संस्कृतीचा अवलंब करत असून आपल्या पाल्यांना आपल्या संस्कृती बाबत माहिती द्यावी ही जबाबदारी प्रत्येक मातेची असून शाळेत देखील माता पिता पूजनासारखे कार्यक्रम राबविण्यात यावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
संस्थेच्या संस्थापिका सुनीता जगताप यांनी संस्थेच्या उभारणीपासून आजपर्यंतचा प्रवास उपस्थित महिलांना सांगितला, ही एक संस्था नसून एक कुटुंबच आहे अशी भावना व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सारिका देशमुख यांनी केले. यावेळी शिक्षिका वनिता वानखडे, काजल चव्हाण, प्रियंका बच्छाव यांसह विद्यार्थी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
यवत येथे महाशिवरात्रीनिमित्त श्री साई धुपारती संपन्न
यवत येथे महाशिवरात्रीनिमित्त ग्रंथ दिंडी सोहळा संपन्न,टाळ मृदुंगाच्या गजरात भाविक झाले तल्लीन