(परवीन इनामदार – शिक्षिका, शिवाजी विद्यालय धामणी ता. आंबेगाव)
पुणे : वैयक्तिक आणि व्यावसायिक उद्दीष्टे साध्य करण्यासाठी दररोज कठोर परिश्रम करणार्या महिलांचे कौतुक करण्याचा हा दिवस आहे. हा दिवस साजरा करण्यासाठी जगभरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. समाज प्रबोधनासाठी मोर्चे देखील काढण्यात येतात. असे काही देश आहेत जेथे महिलांना समान वागणूक दिली जात नाही. म्हणूनच या देशांमध्ये महिलांच्या मुक्तीसाठी निषेध साजरा केला जातो.
बहुतेक लोकांसाठी महिलांची भूमिका केवळ घरातील कामे करण्यासाठीच मर्यादित असतात. त्यामुळे त्यांना चुल आणि मूल यामध्ये अडकविण्याची पुरुष संस्कृती आपण पाहतोच. यामध्ये बदल होणे आवश्यक आहे. कारण स्त्रिया पुरुषांसारख्या प्रत्येक गोष्टीत समान स्वातंत्र्य आणि संधीसाठी पात्र आहेत.
जग पुरुष आणि स्त्रिया दोघांमधील समतोलकडे वाटचाल करत आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनी प्रत्येकजण त्यांच्या आयुष्यातील महिलांचे कौतुक करतो. प्रत्येकजण आपल्या आयुष्यातील महिलांचे महत्त्व आणि तसेच त्यांच्या समाजात देखील केलेल्या योगदानाची कबुली देते.
व्यावसायिक जीवनात किंवा वैयक्तिक जीवनात ‘महिला दिन’ साजरा करणे ही एखाद्याच्या जीवनातील प्रत्येक स्त्रीची जबाबदारी आहे. महिला सक्षमीकरणासाठी ही जबाबदारी समाजाने घेणे गरजेचे आहे.
बहुतेक देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय सुट्टी म्हणून पाळला जातो. शांतता, न्याय, समानता आणि विकासासाठी केलेल्या संघर्षाची आठवण ठेवण्यासाठी देशभरातील महिला विविध सांस्कृतिक आणि वंशीय समूहांच्या सर्व सीमा पार करतात. आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणजे स्वत: ची किंमत जाणवणे आणि संभाव्यतेनुसार उद्दीष्टे साध्य करणे. जीवनातील सर्व अडथळे पार करण्यासाठी चे धैर्य स्त्रियांनी ठेवले पाहिजे.
महिलांशी संबंधित विषय किंवा अडचणी फार मोठी गोष्ट नाहीत. समाजातील सर्वसाधारण गैरसमज आहे. महिलांच्या अनेक समस्या आहेत. मात्र त्या सोडविण्यासाठी होणारा पुढाकार कमी आहे. हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
स्त्री पुरूषातील सामाजिक अंतर समाजात हे त्यांच्या जन्मदरावरून आपल्याला लक्षात येते. त्यामुळे कोणताही महिलांच्या जीवनात बदल आणू शकत नाहीत. समाजामध्ये बदल होणे आवश्यक आहे. कारण आपण सर्व मानव जात एकच आहोत. त्याचप्रमाणे समान हक्क आणि समान संधी सर्वांना मिळाल्या पाहिजेत. आतापर्यंत स्त्रियांपेक्षा पुरुषांना समाजामध्ये अनेक संधी प्राप्त झाल्या आहेत. मागील काही वर्षांचा आलेख पहिला तर स्त्रियांनी अनेक क्षेत्रामध्ये विलक्षण कामगिरी केली आहे.पुरूषांपेक्षाशी त्यांचा दर्जा वरचा राहिला आहे.
आपल्या समाजामध्ये स्त्री किंवा महिला अनेक जबाबदाऱ्या पार पाडत असते. कधी ती गृहिणी असते, कधी ती आई असते , कधी ती बायको असते, कधी ती आजी असते. यांच्या अस्तित्वाची व संरक्षणाची जबाबदारी समाजानेच का घेऊ नये. अखेर हे आपल्या कुटूंबातील एक व्यक्तीच आहे ना. स्त्रीला समाजात प्रत्येक ठिकाणी दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न वरिष्ठांकडून केला जातो हे बंद झाल्याशिवाय कोणत्याही क्षेत्रातील प्रगती अशक्य आहे पुरुष व स्त्री समान आहेत हे पुरुषाने विसरता कामा नये.
शब्दांकन : युनूस तांबोळी