लोणी काळभोर, (पुणे) : मुलासोबत पळून गेलेली मुलगी घरी आली का? असे माझ्या मुलाला का विचारले. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेला मारहाण करून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील पांडवदंड परिसरात गुरुवारी (ता.21) सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
याप्रकरणी 35 वर्षीय महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तानाजी माडले व कल्पना तानाजी माडले (दोघेही रा. जोरेवस्ती, पांडवदंड रोड, कदमवाकवस्ती, ता. हवेली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे दोघेही एकमेकांच्या परिचयाचे असून एकाच परिसरात राहतात. दरम्यान, मागील पंधरा दिवसांपूर्वी फिर्यादी महिलेची मोठी मुलगी मुलांसोबत पळून गेली आहे.
दरम्यान, फिर्यादी यांचा मुलगा गुरुवारी (ता.21) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शाळेतून घरी चालला होता. तेव्हा दुकानदार तानाजी याने मुलाला विचारले की, पळून गेलेली बहीण आली? तुझ्या आईवडीलांना फोन करते का? असे विचारले. तेव्हा मुलगा नाही म्हणाला. तेव्हा दुकानदार म्हणाला मला रोज कॉल करते, ती दोन चार दिवसा नंतर घरी येणार आहे. त्यानंतर मुलाने दुकानदार असे विचारीत असल्याचे फिर्यादी यांना सांगितले.
त्यानंतर फिर्यादी या दुकानदाराकडे असे का विचारले, याचा जाब विचारण्यासाठी गेल्या असता दुकानदार फिर्यादी यांच्या अंगावर धावुन आले आणि तुमची मुलगी तुम्हाला सांभाळता येत नाही. असे म्हणून शिवीगाळ करून विनयभंग केला. तर आरोपींच्या पत्नीने फिर्यादी यांना मारहाण केली.
याप्रकरणी 35 वर्षीय फिर्यादी यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दुकानदार दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनरीक्षक किरण धायगुडे करीत आहेत.