पुणे : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गालगत असलेल्या झुडपात एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे. आज सोमवारी (दि. २५) दुपारच्या सुमारास तळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना उघडकीस आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाजवळील झुडपात एका महिलेचा मृतदेह आढळला आहे. महिलेची हत्या करून मृतदेह पोत्यात बांधून झुडपात फेकण्यात आला आहे. आज सोमवारी दुपारी दुर्गंधी पसिरसरात पसरली. त्यानंतर आयआरबी पथकाने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असा पोलिसांना एका पोत्यात महिलेचा मृतदेह आढळून आला.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाजवळील हत्या करण्यात आलेल्या महिलेचं अंदाजे वय ३५ वर्ष असावे. पण ती महिला नेमकी कोण? तिची हत्या कोणी केली? येथील झुडपात मृतदेह कोणी आणून टाकला? याचा शोध पोलीस घेत आहेत. तर दुसरीकडे ही हत्या नेमकी कशी आणि कधी करण्यात आली? याचा शोध सुरु आहे. दरम्यान या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.