पिंपरी : गांजा विक्रीसाठी आलेल्या महिलेला अमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली. तिच्याकडून २५० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. शनिवारी (दि. १९) दुपारी चिंचवडमधील वेताळनगर झोपडपट्टी येथे हि कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पोलीस अंमलदार सदानंद रुद्राक्षे यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वेताळ नगर झोपडपट्टी चिंचवड येथे एक महिला गांजा विक्रीसाठी आल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयित महिलेला ताब्यात घेतले. तिची अंगझडती घेतली असता तिच्याकडून १२ हजार ५०० किमतीचा २५० ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी गांजा जप्त करून महिलेला ताब्यात घेतले. या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.