सासवड : पुरंदर तालुक्यात आदिम जमातीचा अतिशय दुर्गम भाग आहे. त्यामुळे या समाजाला आरोग्य, शिक्षण, परिवहन मंडळ सुविधा देखील एक मोठी आव्हाने आहे. त्यांच्या न्याय हक्कासाठी हा समाज जंगलात राहून वस्त्र शून्य व अर्धवस्त्र समाज असणारा आदिवासी समाजाची प्रत पुसून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वपक्षीय पद्धतीने दिल्लीपर्यंत हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन आमदार संजय जगताप यांनी दिले.
सासवड तालुका पुरंदर येथे आचार्य अत्रे सभागृहात आज महादेव कोळी आदिवासी समाज बांधव यांचा आंतरराष्ट्रीय विश्व आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संजय जगताप बोलत होते.
आमदार संजय जगताप पुढे बोलताना म्हणाले, दळणवळण साधने व इतर तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. महादेव कोळी आदिवासी या जमातीतील मुख्य समाज भाषा कोंडी मांडीया आधी भाषांचे संवर्धन कसे होईल, रूढी, परंपरा याची माहिती मिळण्यासाठी प्रयत्न करून दिला जाईल, असे आश्वासन यावेळी जगताप यांनी दिले.
यावेळी मशाल प्रज्वलन करून, आदिवासी आद्य क्रांतिकारक यांची भव्यश्लोक यात्रा तहसील कचेरी पासून ते भैरवनाथ मंदिर चौक ते आचार्य त्रे सभागृहापर्यंत करण्यात आली. नंतर वृक्षारोपण करून, विविध प्रकारच्या प्रबोधन आदिवासी चालीरीती, रूढी, परंपरा ,पारंपारिक नृत्य यांची चिवेवाडी व बहिरवाडी शाळेतील कोळी समाजाच्या वतीने दोन-दोन नृत्य प्रदर्शित करण्यात आली. आदिवासी कवी गणेश ढगारे यांचा पोवाडा व कविता सादर करण्यात आली. आदिवासी गणातील सोंग, वनापाज, रानमेवा, भारुड, प्रदर्शन, ढोल, लेझीम पथक तसेच सरपंच, सदस्य, विद्यार्थी मान्यवरांचा सन्मान कोळी समाजाच्या वतीने करण्यात आला.