पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार एकत्र आल्यास आश्चर्य वाटू नये, असे सूचक विधान मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केले आहे. निवडणुकीच्या काळात काका मला वाचवा असं बोलणारे आता दादा मला वाचवा असं बोलत आहेत.
भविष्यात शरद पवार आणि अजित पवार एकत्र येत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध झाला तरी प्रत्येक कार्यकर्ता हा आनंदी असणार आहे. मात्र, अजितदादा यांच्या कठीण काळात ज्यांनी साथ दिली त्यांना विश्वासात घेणे महत्त्वाचे आहे, असंही आमदार सुनील शेळके यांनी म्हटलं आहे.
शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र येण्याची गरज : सुनंदा पवार
दरवर्षीप्रमाणे यंदाही 20 ते 25 डिसेंबर या काळात पुण्यातील शिवाजीनगर भागात ‘भीमथडी जत्रा’ आयोजित केली आहे. या यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीबाबत प्रश्न विचारण्यत आला. तेव्हा शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं सुनंदा पवार म्हणाल्या आहेत.