पुणे : जेवण न दिल्याचा व दारू पिल्याचा राग मनात धरून ३२ वर्षीय पत्नीचा पतीने खून केल्याची घटना बिबवेवाडीतील अप्पर इंदिरानगर मध्ये सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे.
सविता संदीप अवचिते (वय ३२) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. तर पती परशुराम उदडंपा जोगण (वय – ३८) असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. गणेश दत्तात्रय शिंदे (वय -३८) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पतीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी परशुराम जोगन हा फिर्यादी यांच्या रिक्षावर ड्रायव्हर म्हणून काम करतो. मयत महिला सविता ही आरोपीची दुसरी पत्नी आहे. दरम्यान सोमवारी सविता हिने जेवण दिले नाही आणि दारू पिली याचा राग मनात धरून आरोपीने तिला शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.
दरम्यान, सविता अवचिते यांचा मारहाणीत मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.