पुणे : व्हॉट्सॲपवर नोटीस पाठवून तिहेरी तलाक दिल्याची एक मोठी बातमी समोर आली आहे. बायकोने नवऱ्याला दुसऱ्या मुलीशी असलेल्या विवाहबाह्य संबंधांबाबत विचारलं असता चक्क व्हॉट्सॲपवर तिहेरी तलाक दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पतीसह दिर, जावा, नणंदा यांच्यासह आठ जणांवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार 2004 ते 2024 दरम्यान विवाहित महिलेच्या सासरी कोंढवा खुर्द येथे घडला.आरोपी पती फिरोजने आयशा यांना 14 जून रोजी पहिली नोटीस पाठवून पहिला तलाक दिला. त्यानंतर आणखी एका महिन्याने दुसरा तर त्यांनतर पुन्हा एका महिन्याने तिसरा तलाक देणार असल्याचे म्हटले आहे. ही नोटीस व्हाट्स अप तसेच पोस्टाने पाठवली आहे.
याप्रकरणी आयशा फिरोज अख्तर (वय-36 वर्षे, सध्या रा. रिव्हर रेसिडन्सी, जी बिल्डींग, गटनं. 90 चिखली) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पती फिरोज अख्तर (रा. फ्लॅट नं. 904, ए-4, ब्राम्हा एमराल्ड काऊंटी सोसायटी, कोंढवा खुर्द), तीन दिर परवेज अख्तर, जावेद अख्तर, एजाज अख्तर, दोन भावजया गझला कमर, नफिसा जावेद व दोन नणंदा रुही नाझ व मुसरत जहा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या महित्यीनुसार, आयशा आणि फिरोज यांचा 24 सप्टेंबर 2004 रोजी झाला आहे. त्यांना साडेसतरा वर्षाची मुलगी आणि एक मुलगा अशी दोन अपत्ये आहेत. विवाहित महिला आयेशा सध्या वडील मुस्ताक अहमद शेख, आई, भाऊ यांच्यासोबत काही महिन्यांपासून चिखली येथे राहत आहे. लग्नाचा सर्व खर्च (10 लाख ) महिलेच्या घरच्यांनी केला आहे. तसेच लग्नात 29.5 तोळे सोने घातले आहे.
लग्न झाल्यावर सासरच्या लोकांनी मला त्रास देवू नये म्हणुन तिच्या वडीलांनी दिल्ली येथील मालमत्ता विकून 1 कोटी 40 लाख रुपये पती फिरोज यांना दिले. त्यातून पतीने हार्दील स्टील कॉपोरेशन नावाने मोशी रोड चिखली येथे स्टील विक्री करण्याचा व्यवसाय सुरु केला. त्यानंतर त्याने पत्नीच्या नात्यातील एका मुलीला शिक्षणासाठी घरी आणले. आता ती 19 वर्षांची असुन ती घरातच राहते. या मुलीशी फिरोजचे अनैतिक संबंध आहेत. त्यामुळे माझे आणि पतीचे वारंवार वाद होऊ लागले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
तसेच फिरोज औषधे खावुन चुकीच्या प्रकारे शारिरीक संबंध ठेवत होता. तसेच पतीचा भाऊ परवेज, जावेद, एजाज व बहिण रोजी हे मला टोमणे मारुन माझ्या चारित्र्यावर संशय घेत मला घराबाहेर काढले. त्यानंतर आरोपी पतीने माझे वैयक्तिक फोटो माझ्या घरच्यांना, नातेवाईकांना तसेच समाज माध्यमावर पाठवून माझी बदनामी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.