पुणे : किरकोळ कारणावरून दगडाने मारहाण केल्याची घटना नुकतीच ताडीवाला रोड परिसरात घडली. माझ्याकडे का बघतो, या किरकोळ कारणावरून तरुणाला दगडाने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याचा हा प्रकार २७ जानेवारी रोजी कोणार्क सोसायटीसमोरील सार्वजनिक रस्त्यावर घडला.
या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. आकाश आनंद चव्हाण (वय २०, रा. एस. आर. ए. बिल्डिंग, पानमळा, ताडीवाला रोड, पुणे) याने सोमवारी (ता. २९) बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन फिरोज तय्यब बेग (वय ३०, रा. स्विपर चाळ, ताडीवाला रोड, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकाच परिसरात राहतात. शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आकाश चव्हाण त्याच्या दुचाकीवरुन कसबा पेठेत राहणाऱ्या मित्राला भेटण्यासाठी जात होता.
फिर्यादी कोणार्क सोसायटीसमोर आले असता, आरोपी फिरोज याने ‘माझ्याकडे का बघत आहेस’, असे म्हणत शिवीगाळ केली. तसेच हाताने मारहाण केली. त्यानंतर त्याठिकाणी पडलेला दगड उचलून आकाशच्या डोक्यात मारुन जखमी केले.