(White Crow) पुणे : कावळा या पक्षाचे नाव घेतले तर लगेच आपल्या डोळ्यासमोर काळा रंगाचा पक्षी समोर येतो. कावळा हा काळा रंगाचाच असतो. असे साफ उत्तर कोणीही देईल. मात्र आता पुण्यातील लुल्ला नगर परिसरामध्ये पांढरा कावळा (White Crow )आढळून आला आहे. कावळ्याचा रंग पांढरा असल्यामुळे हा कावळा परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.
नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त …!
काळ्या कावळ्यांच्या समूहामध्ये अशा प्रकारचा पांढरा कावळा दिसल्यावर साहजिकच आश्चर्य वाटण्यासारखी बाब आहे. यामुळे पांढऱ्या रंगाचा कावळा पाहिल्यानंतर नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे. या कावळ्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
पांढऱ्या रंगाचा कावळा हा १० हजार कावळ्यांमधून एखादा सापडतो. जनुकीय विकारामुळे कावळ्यांमध्ये अल्बिनिझम किंवा ल्यूसिझम म्हणजे पंखांमध्ये रंगद्रव्य साठवण्याची क्षमता कमी होते. रंगद्रव्य साठवण्याची क्षमता कमी झाल्याने पांढऱ्या रंगाचे कावळे आढळून येतात. असे तज्ज्ञांचे मत आहेत.
दरम्यान, काळ्या कावळ्यांच्या समूहामध्ये अशा प्रकारचा पांढरा कावळा दिसल्यावर साहजिकच आश्चर्य वाटण्यासारखी बाब आहे. या आधीही दोन वर्षांपूर्वी शिरूर भागामध्ये अशा प्रकारचा कावळा लोकांच्या दृष्टीस पडला होता.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pune Crime | टेम्पो चालकाने रिक्षा चालकाच्या छातीत मारली बुक्की ; रिक्षा चालकाचा जागेवरच मृत्यू
Pune Crime | सॉफ्टवेअर डेव्हलपर तरूणीचा विनयभंग ; तरूणाने नग्न होत केले असे काही