Saturday, August 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिरूर तालुक्यात गहू काढणीला सुरूवात; वेळेत मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची हार्वेस्टरला पसंती

युनूस तांबोळीby युनूस तांबोळी
Tuesday, 25 February 2025, 10:49

शिरूर : शिरूर तालुक्यात रब्बी हंगामातील पिकांच्या काढणी, मळणी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. मुख्य गहू उत्पादक शेतकऱ्यांनी गहू काढणी, मळणीसाठी हार्वेस्टरला पसंती दिली आहे. या हंगामात वाढलेले ऊन, यात्रा जत्रांचा हंगाम यामुळे मजूर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. पर्यायी व्यवस्था म्हणून शेतकऱ्यांनी हार्वेस्टरला पसंती दिल्याचे दिसत आहे.

शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात जांबूत, काठापूर, पिपंरखेड, चांडोह, फाकटे या ठिकाणी सध्या गहू काढणीला सुरूवात करण्यात आली आहे. कवठेयेमाई, मलठण, सविंदणे, आमदाबाद त्याबरोबर कान्हूर मेसाई, गणेगाव खालसा, मोराची चिंचोली, शास्ताबाद या ठिकाणी गहुचे उत्पादन करणारा शेतकरी व गव्हाचे क्षेत्र असणारा परिसर आहे. या परिसरात शेतात हार्वेस्टरच्या सहाय्याने गहू कापणी सुरू असून गहू उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. हरियाणा, पंजाब या ठिकाणाहून हार्वेस्टर यंत्र या ठिकाणी आली आहेत.

दरवर्षी रब्बी हंगाम संपल्यानंतर हे यंत्र याच भागात सुरक्षित व्यवस्थित ठिकाणी ठेवले जातात. नंतर हंगाम सुरू झाल्यानंतर पुन्हा शेतावर ही यंत्र आणली जातात. शिरूर तालुक्यात बहुतांश ठिकाणी पारंपारिक शेतीला फाटा देत यांत्रीकीकरणाची कास शेतकऱ्यांनी धरली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सध्या रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू आहे. त्यात गव्हाची काढणी व मळणी वेळेत व्हावी यासाठी हार्वेस्टर यंत्राचा वापर होताना दिसत आहे.

सध्या पहाटे जाणवणारी थोडीसी तुरळक थंटी तर सकाळ पासूनच जाणवणारा कडक उन्हाळा वातावरणात बदल घडवून आणत आहे. त्यात या काळात ग्रामदैवताच्या यात्रा, जत्रा, ऊरूस यामुळे मजूर गावाकडे जाऊ लागले आहेत. त्यातून मजूरांची कमतरता जाणवू लागली आहे. मजूरांचा होणारा तुटवडा आणि वेळेत होणारी बचत लक्षात घेऊन शेतकऱ्यांचा हार्वेस्टरकडे कल वाढला आहे. पारंपारिक पद्धतीने रब्बी पिकांची कापणी, मळणी करताना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. हार्वेस्टरने वेगळी मजूरी मजूरांना द्यावी लागत नाही. शिवाय वेळेची बचत होत असल्याचे शेतकरी चांडोह गावचे पाडूरंग सालकर यांनी सांगितले.

 

 

 

युनूस तांबोळी

युनूस तांबोळी

गेल्या २२ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव व कार्यरत आहे. राज्याचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान २०१२ -२०१३ मध्ये व्दितीय क्रमांक, २०१४-२०१५ मध्ये जिल्हात प्रथम क्रमांक, कवठे येमाई भुषण पुरस्कार, आंबेगाव शिरूर मध्ये माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान, शिरूर तालुका पदवीधर संघ करपे पुरस्काराने सन्मानित, सातारा येथील अंध अपंग संस्थेकडून गौरव, मराठी भाषा निमित्त मनसे कडून गौरव, गेली २० वर्षात लहान मोठ्या संस्थाकडून गौरव व सन्मानचिन्ह २ वर्षे संवाद वाहिनी या वृत्तवाहिनी सोबत कार्य, दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २० वर्षे कार्यरत, राजकारण, लेख, सदर, कवीता, या माध्यमातून लिखाण, फोटोग्राफी आणि व्हिडीयो यात विशेष प्रावीण्य , साम मराठी व इ सकाळच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण सध्या पुणे प्राईम मधून पुन्हा लिखाणाची संधी मिळाल्याने कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मोठा विजय! 17 दिवसांच्या उपोषणानंतर सरकार झुकलं; धडाधड GR जारी

Saturday, 29 August 2026, 22:39

धबधब्यावरचा आनंद ठरला अखेरचा!पाय घसरला अन् तरुणी वाहून गेली; दुर्दैवी मृत्यू

Saturday, 29 August 2026, 21:39

पोल्ट्री आणि पशुपालकांच्या न्याय्य हक्कासाठी 1 सप्टेंबरला पुण्यात मूक मोर्चा: GR असूनही अंमलबजावणी का नाही?

Saturday, 29 August 2026, 21:24

खाजगी क्लासला फाटा; स्व-अभ्यासाच्या जोरावर ऋषिकेश बेंद्रे राज्यात प्रथम!

Saturday, 29 August 2026, 20:16

भरधाव कंटेनरची तीन कारला पाठीमागून धडक; खेड-शिवापूरजवळ अपघातात वाहनांचे नुकसान

Saturday, 29 August 2026, 19:56

थेऊरमध्ये विजेचा शॉक लागून महावितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू

Saturday, 29 August 2026, 19:41
Next Post

पुण्यात भरधाव वेगातील कारची दुचाकीला धडक ; दुचाकी स्वार जखमी तर गाडीचा चुरडा..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp