(Maharashtra News) पुणे : राज्यातील सुमारे 14 लाख कर्मचारी जुन्या पेन्शन योजनेसाठी आक्रमक झाले असून त्यांनी थेट संपावर जाणार असल्याचा इशारा राज्य सरकारला दिला आहे. या भूमिकेमुळे राज्य सरकारनचे दाबे दणाणले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस यांनी यांवर साधव पाऊल टाकत संपावर जाणे या पर्याय नसून चर्चेने मार्ग काढूयात, असे सांगत संपावर जाऊ नये, असे आवाहन राज्यातील कर्मचाऱ्यांना केले आहे.
राज्यातील वातावरण चांगलेच तापणार…
संपावर जाण्याच्या घोषणेमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापणार की राज्य सरकार त्यावर मार्ग काढत ते थंड करणार असा प्रश्न या निमित्ताने चर्चीला जात असताना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
अनेक राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. या मागणीसाठी कर्मचारी संघटनेने 14 मार्चला संपावर जाणार आहेत. कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केल्यास राज्याच्या अर्थव्यवस्थेवर भार येणार आहे. त्यामुळे या प्रश्नावर चर्चेतून तोडगा काढण्याची सरकारची तयारी असून कर्मचाऱ्यांनी संपावर न जाता चर्चेला यावे, असे आवाहनही फडणवीस यांनी केले आहे.
अशी आहे जुनी पेन्शन योजना..
– जुनी पेन्शनमध्ये निवृत्तीवेळच्या पगाराची निम्मे रक्कम पेन्शन मिळायची. नवी पेन्शन योजना सहभागाची आहे, ज्यात फक्त ८ टक्के रक्कम मिळते.
– जर तुमचा पगार ३० हजार असेल तर जुनी पेन्शन योजनेता १५ हजार पेन्शन बसायची. नवी पेन्शन योजनेत ३० हजार पगारावर २२०० रुपये पेन्शन बसते.
– जुनी पेन्शनमध्ये नोकदाराला स्वःताच्या पगारातून रक्कम द्यावी लागत नव्हती. नवी पेन्शनमध्ये दर महिन्याच्या पगारातून १० टक्के रक्कम कर्मचारी आणि त्यावर १४ टक्के रक्कम सरकार देतं.
– जुनी पेन्शन योजनेत जास्तीत जास्त पेन्शन ही ९१ हजारांपर्यंत होती. नवी पेन्शन योजनेत जास्तीत जास्त पेन्शन ही ७ ते ९ हजारांपर्यंतच मिळते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
एलआयसीची नवीन ‘पेन्शन प्लस’ही योजना काय आहे,सविस्तर जाणून घ्या
अन्… कुंजीरवाडीच्या आजीला पेंशन मिळाली