राजेंद्रकुमार शेळके
नारायणगाव : नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळाचे श्रीमती एस.आर केदारी बालक मंदिर मध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा करून इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे लेझीम व ढोल-ताशांच्या गजरात स्वागत केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता पारखे यांनी केले. तसेच शाळेचे चेअरमन अरविंद मेहेर आणि सदस्या मोनिका मेहेर यांनी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थी व पालकांचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला ग्रामोन्नती मंडळाचे विश्वस्त डॉ. विद्वांस तसेच अध्यक्ष प्रकाश मामा पाटे, कार्याध्यक्ष अनिल तात्या मेहेर, कार्यवाह रविंद्र पारगावकर, बालकमंदिर शाळेचे चेअरमन अरविंद मेहेर, अनंतराव कुलकर्णी, इंग्लिश मिडीयम स्कूलचे चेअरमन आनंद कुलकर्णी तसेच शिक्षणशास्त्र महाविद्यालय समितीचे अध्यक्ष रमेश जुन्नरकर, बालक मंदिर समितीचे सदस्य शशिकांत वाजगे, बालक मंदिर समितीच्या सदस्या मोनिका मेहेर, बालकमंदिर समितीचे सदस्य देविदास भुजबळ, ग्रामोन्नती मंडळाचे कृषी तंत्रनिकेतन माळी प्रशिक्षण वर्ग व शेती समितीचे चेअरमन रत्नदीप भरविरकर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता पारखे व उपमुख्याध्यापिका अरुणा कानडे या सर्वांनी नवोगतांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.
शाळेचा संपूर्ण परिसर आकर्षक पद्धतीने सजावट करून सुशोभित करण्यात आला होता. तसेच शाळेच्या परिसरात सुंदर घोषवाक्ये लावण्यात आली होती. या कार्यक्रमाचे औचित्य साधून शाळेतील संगीत शिक्षक राहुल दुधवडे यांनी आपल्या सुमधूर आवाजात गणपतीचे गीत व बालगीत सादर केले. पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा पूजा घोडेकर यांनी देखील सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. इयत्ता पहिलीच्या नवीन विद्यार्थ्यांनी देखील आपल्या शाळेविषयी मनोगत व्यक्त केले.