पुणे : संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) उष्णतेची लाट सुरू झाली आहे. अंगांची लाहीलाही होत असून या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शहर आणि परिसरात दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस पडलाय. त्यामुळे हवेत आद्रतेचे प्रमाण वाढले आहे त्यात पुणेकरांना (puen) अजून उकाड्याचा सामना करावा लागत आहे. सकाळी अन् सायंकाळी तापमान कमी झाले असले तरी हवेतील आर्द्रता वाढतेय. त्यामुळे तापमान (Temperature) कमी असतानाही म्हणजे दिवस रात्र उकाड्याचा सामना करावा लागत आहे, अशी माहिती हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी (Dr. Anupam Kashyapi) यांनी दिली आहे.
राज्यातील अनेक भागात उन्हाचा कडाका इतका वाढला आहे की, लोक दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळत आहेत. त्यात या अवकाळी पावसाच्या हजेरीनंतर तापमानात घट होण्याचा अंदाज होता. पण, गुरुवारी पुन्हा हडपसर, वडगाव शेरी, कोरेगाव पार्क येथील पारा ४३ अंशांच्या वर गेला होता. पुणे शहर आणि उपनगरात यंदाच्या एप्रिल महिन्यांत मागील अकरा वर्षांतील उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे.
यंदा पुणे शहर आणि उपनगरात एप्रिल महिन्यांमध्ये मागील अकरा वर्षांतील उच्चांकी तापमानाची नोंद झालीय. २०१३ पासून २०२३ पर्यंत पुण्यामध्ये एप्रिल महिन्याचे तापमान सरासरी ३७ ते ४० अंश सेल्सिअस होते. २०१९ मध्ये एप्रिल महिन्याच्या अखेरीस २७ एप्रिल रोजी पारा ४३.० अंशांवर गेला होता. त्यानंतर यंदा एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सलग पाच-सहा दिवस उपनगरात पारा ४३ अंशांच्या वर राहिला आहे. प्रामुख्याने वडगाव शेरी, कोरेगाव पार्क, लवळे, हडपसर आदी ठिकाणी पारा ४३ अशांच्या वर गेल्याचे दिसून येत आहे. या उष्णतेमुळे नागरिकांना अधिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.