Weather News | पुणे : राज्याच्या विविध भागांमध्ये पुढील पाच दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने हा अंदाज वर्तवला आहे. या पावसामुळे शेतीतील पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काळजी घेण्याच्या सूचना हवामान विभागाने दिल्या आहेत.
मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडय़ासाठी हा अंदाज…
सोसाट्याच्या वाऱ्यासह, पावसाच्या सरी आणि काही ठिकाणी गारपिटीचा इशाराही देण्यात आला आहे. हा अंदाज राज्यात पावासाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शनिवारपर्यंत हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडय़ासाठी हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यापासून प्रतिबंधासाठी तयारीत राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
या पावसामुळे शेतीतील पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काळजी घेण्याच्या सूचना हवामान विभागाने दिल्या आहेत. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात १३ ते १६ मार्चदरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला गेला आहे. तर विदर्भात १४ ते १६ मार्च दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता असल्याने आता शेतकऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
New Virus : पुण्यात “एच ३ एन २” चा धोका वाढला ; तब्बल ‘एवढे’ रुग्ण आढल्याची
Fraud News : रुग्णावाहिकेमध्ये डीझेल न भरता परस्पर पैसे घेऊन चालकाने भारती हॉस्पिटलची केली फसवणूक