पुणे : पर्वती जलकुंभ येथे विद्युत, पंपिंग आणि स्थापत्य विषयक तातडीची देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत. येत्या गुरूवारी ८ फेब्रुवारीला पाणीपुरवठा विभागाकडून या पर्वती टाकीवर अवलंबून असलेल्या भागाचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी ९ फेब्रुवारी रोजी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे.
या भागाचा पाणीपुरवठा बंद
सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगरचा काही भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणी नगर भाग १ आणि २, लेक टाऊन, शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, शेळकेवस्ती, महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, आंबेडकरनगर, डायस प्लाॅट, ढोले मळा, सॅलिसबरी पार्क परिसर, गरीधर भवन चौक, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, मीठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदयक नगर, ज्ञानेश्वर नगर, साईबाब नगर याबरोबरच कोंढवा खुर्दचा काही भाग, पर्वती दर्शन, तळजाई, कात्रज परिसर आणि धनकवडी या भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे.