पुणे : पुणे शहराचा गुरुवार 21 डिसेंबर रोजी संपूर्ण पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती महानगरपालिकेनी दिली आहे. पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, लष्कर जलकेंद्र, नवीन आणि जुने होळकर जलकेंद्र, भामा-आसखेड जलकेंद्र, वारजे, एसएनडीटी, चतु:श्रृंगी, वडगांव जलकेंद्र, अशा अनेक ठिकाणी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीची कामं करण्यात येणार आहे. यामुळे शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय महानगरपालिकेकडून घेण्यात आला आहे.
दरम्यान, पुणे महानगरपालिकेकडून शहरात शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची जाहीर नोटीस देखील काढण्यात आली आहे. पुण्यातील मध्यवर्ती भाग तसेच पेठांमध्ये गुरुवारी पाणी येणार नसल्याचं सांगण्यात आलं असून पुणेकरांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आलं आहे.
‘या’ भागातील पाणीपुरवठा बंद
शहरातील सर्व पेठा, क्वार्टरगेट परिसर, गंजपेठ, गुरुवार पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन परिसर, शिवाजी नगर, स्वारगेट, सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणीनगर 1 आणि 2, लेक टाऊन परिसर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, बिबवेवाडी गावठाण, डायस प्लाॅट, ढोले मळा परिसर, सॅलेसबरी पार्क, गिरीधर भवन चौक परिसर, पर्वती गावठाण, मीठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदयनगर, कोंढवा खुर्द, पर्वती दर्शन, तळजाई, कात्रज, धनकवडी परिसर, हडपसर, सातववाडी, गोंधळेनगर, ससाणेनगर, काळे पडळ, बीटी कवडे रस्ता, भीमनगर, रामटेकडी, औद्योगिक परिसर, वानवडी, पुणे कॅन्टोन्मेंट परिसर, केशवनगर, साडेसतरा नळी, फुरसुंगी, उरूळी देवाची, मांजरी बुद्रुक, शेवाळवाडी, खराडी, वडगांवशेरी, ताडीवाला रस्ता, मंगळवार पेठ, मालधक्का, येरवडा, रेसकोर्स, मुळा रस्ता, खडकी, हरीगंगा सोसायटी, लोहगांव, विमाननगर, वडगांवशेरी, कल्याणीनगर, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा, कळस, धानोरी, पाषाण, भूगाव रस्ता, बावधन, उजवी आणि डावी भुसारी काॅलनी, गुरूगणेशनगर, चिंतामणी सोसायटी, पूजा पार्क, सारथी शिल्प सोसायटी, डुक्कर खिंड परिसरातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहिल. तसेच शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. अशी जाहीर नोटीस काढण्यात अली आहे.