पुणे : भामा आसखेड प्रकल्पाचे अखत्यारीतील कुसमाडे वस्ती येथील नवीन टाकी ही मुख्य जलवाहिनला जोडणे आणि ठाकरसी टाकीवरील स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे शहरातील काही भागाचा पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा गुरुवारी २९ फेब्रुवारीला बंद राहणार आहे. या सर्व भागाला शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.
तर शुक्रवारी १ मार्च रोजी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी केले आहे.
या भागाचा पाणी पुरवठा बंद
आदर्शनगर , कल्याणीनगर, हरीनगर, रामवाडी, शास्त्रीनगर, संपूर्ण गणेशनगर म्हस्के वस्ती परिसर, कळस, माळवाडी, जाधव वस्ती, विशाल परिसर, विश्रांतवाडी स. नं. ११२ अ, कस्तुरबा, टिंगरेनगर पंप ते विश्रांतवाडी चौक, जयजवान नगर, जय प्रकाशनगर, संजय पार्क, एयर पोर्ट, यमुना नगर, दिनकर पठारे वस्ती, पराशर सोसायटी, श्री. पार्क, ठुबे पठारे नगर या परिसरातला पाणीपुरवठा बंद राहणार आहे.