चाकण: खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणातून चालू वर्षीच्या रब्बी हंगामातील पहिले आवर्तन सोडण्यात आले आहे. धरणाच्या दोन दरवाजांतून १२०० क्युसेकने हे पाणी सोडले आहे. यामुळे शेतकनांनी आनंद व्यक्त केला.
भामा आसखेड हे खेड तालुक्यातील पश्चिम भागात भामा नदीवर उभारलेले मातीचे धरण आहे. धरणाची पाणी साठवण क्षमता ८.१४ टीएमसी इतकी आहे. चालू वर्षी धरण परिसरात १ जूनपासून १२९९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणात सध्या पाणीसाठा हा ९९.६५ टक्के म्हणजे ८.१२ टीएमसी आहे. तर ७.६४ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे.
मागील वर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात धरणात ८८.३२ टक्के पाणीसाठा होता. धरणाच्या दोन दरवाजातून बाराशे क्युरोक वेगाने हे पाणी सोडण्यात आले असून त्यासाठी एक आणि चार क्रमांकाचे दरवाजे वीस सेंटीमीटरने वर उचलण्यात आले आहेत. आलेगाव पागापर्यंत असणारे १८ बंधारे या आवर्तनातून भरले जाणार आहेत.