Pune News : सणसवाडी / अमोल दरेकर : शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वसेवाडी (सणसवाडी) या शाळेसाठी वॉटर ऑर्गनजशन या संस्थेच्या माध्यमातून जॉन डिअर या ट्रॅक्टर उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या सामाजिक दायिकत्व (CSR) फंडातून सात संगणक संच देण्यात आले.
वॉटर ऑर्गनजशन या संस्थेच्या विविध ३२ विभागात काम केले जातात. त्यापैकी शिक्षण क्षेत्रात येथील मुलांचा सर्वांगीन विकास त्याचबरोबर जगाशी जोडण्यासाठी संगणक प्रशिक्षण गरज ओळखून प्राथमिक शिक्षण काळात विद्यार्थीदशेत माहिती व्हावी, या उद्देशाने देण्यात आल्याचे संस्थेचे अधिकारी रोहन काळे यांनी सांगितले
यावेळी केंद्रप्रमुख टिळेकर, संस्थेचे अधिकारी रोहन काळे, ग्रामपंचायत सदस्य ललिता दरेकर, शाळा व्यस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल हरगुडे, उपाध्यक्ष अमोल दरेकर, सदस्य सेवागिरी रणपिसे, बाळू धोत्रे, रंजना हरगुडे, सोनाली पवार, संगिता नागरगोजे, अश्विनी दरेकर आणि मुख्याध्यापक संतोष गोसावी आदी उपस्थित होते.