वानवडी : प्रवासादरम्यान अथवा विविध ठिकाणी गहाळ झालेले सुमारे ६ लाख २५ हजार रुपये किंमतीचे 45 मोबाईल फोन तांत्रिक विश्लेषणाच्याआधारे शोध घेऊन हस्तगत करण्यात वानवडी पोलिसांना यश आले आहे. हे मोबाईल फोन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आनंदाची बातमी देऊन परत करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांच्यामध्ये आनंदाचे वातावरण पसरले त्यांनी पोलीसांचे आभार व्यक्त केले आहेत.
सदरची कारवाई पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्तरंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त (पुर्व प्रादेशीक विभाग) मनोज पाटील, परिमंडळ ५ चे पोलीस उपआयुक्त आर राजा व सहायक पोलीस आयुक्त गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकसंजय पतंगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गोविंद जाधव, तपास पथकाचे पोलीस उपनिरिक्षक संजयआदलिंग, पोलीस हवालदार अतुल गायकवाड, अमोल पिलाणे, आनंद दरेकर, महेश गाढवे, दया शेगर, हरी कदम, सर्फराज देशमुख, संदिप साळवे, सोमा कांबळे, गोपाळ मदने, यतिन भोसले, विष्णू सुतार, अमोल गायकवाड व सुजाता फुलसुंदर यांच्या पथकाने केली आहे.
दरम्यान, मोबाईल हरविल्यानंतर तक्रारदार यांनी तक्रार पुणे पोलीस वेबसाईट वरील लॉस्ट अॅण्ड फाऊंट वर तसेच शासनाचे CEIR या पोर्टवर तात्काळ नोंद करावी. असे आवाहन पुणे शहर पोलिसांकडून करण्यात आले आहे.