Friday, September 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोठी बातमी…! लोकसभेचा घोळ विधानसभेत नको; निवडणूक चिन्हांच्या यादीतून ‘पिपाणी’ वगळा, शरद पवार गटाचा निवडणूक आयोगाला इशारा

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 24 June 2024, 15:31

पुणे : लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाला ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे निवडणूक चिन्ह देण्यात आलं होतं. तर अपक्ष उमेदवारांना या चिन्हाशी साम्य असलेलं ‘पिपाणी’ हे चिन्ह अनेक अपक्ष उमेदवारांना मिळालं होतं. ‘पिपाणी’ या चिन्हांतील गोंधळामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाला फटका बसला. सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार शशिकांत शिंदे पराभूत झाले, असा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला होता.

त्यामुळे शरद पवारांच्या ‘राष्ट्रवादी’कडून निवडणुक आयोगाला पत्र लिहिलं आहे. पिपाणी या चिन्हाला निवडणूक चिन्हांच्या यादीत ‘तुतारी’ असं नाव आहे. तसेच चिन्हांमध्ये साम्य आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत पिपाणी चिन्ह वगळण्याची विनंती निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीत तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाबरोबरच अपक्ष उमेदवारांना ‘पिपाणी’ हे चिन्ह दिलं. या चिन्हाला ‘तुतारी’ हे नाव असल्याने मतदारांमध्ये मोठा गोंधळ उडाला होता. दरम्यान, ‘पिपाणी’ हे चिन्ह असलेल्या अपक्ष उमेदवारांना मोठ्या प्रमाणावर मतं मिळाली. त्यामुळे शरद पवार गटातील उमेदवारांचे नुकसान झाले, असा दावा पक्षातील नेत्यांनी केला आहे.

याच पार्श्वभूमीवर निवडणूक चिन्हांच्या यादीतून ‘पिपाणी’ हे चिन्ह हटवा अशी मागणी शरद पवार गटाने केली आहे. आयोगाला पाठवलेल्या पत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने म्हटलं आहे, की पिपाणी या चिन्हामुळे आम्हाला फटका बसला. त्यामुळे तुम्ही या संदर्भात उचित निर्णय घ्या, अन्यथा आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ, असा इशाराच देण्यात आला आहे.

 

काय म्हटलं आहे नेमकं पत्रात?

लोकसभा निवडणुकीत ‘पिपाणी’ चिन्हामुळे जो फटका बसला आहे. तो फटका विधानसभेला बसू नये, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून दक्षता म्हणून निवडणूक आयोगाला पत्र पाठवले आहे. फ्री सिम्बॉलमधून ‘पिपाणी’ हे चिन्ह वगळण्याची विनंती करण्यात आली आहे.

फ्री सिम्बॉल मध्ये पिपाणी आणि तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाचा समावेश असल्याने अडचणी येत असल्याचा उल्लेख पत्रात केला आहे. तसेच याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा न्यायालयाचे दार ठोठावणार असल्याचेही पत्रात नमूद केले आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

चांदणी चौक-भूगाव उड्डाणपुलाची निविदा रद्द; ४५ कोटींच्या आरोपांनंतर महापालिका प्रशासनाचा मोठा निर्णय

Thursday, 3 September 2026, 23:04

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा लिपिक ACBच्या जाळ्यात! ‘कर’ कमी करण्यासाठी मागितली १.२० लाखांची लाच; सांगवीत रंगेहाथ अटक

Thursday, 3 September 2026, 22:48

तुकाराम मुंढेंचा धडाकेबाज निर्णय! आता महाप्रसाद, लंगर आणि भंडाऱ्यांमधील अन्नाची गुणवत्ता थेट FDA च्या रडारवर

Thursday, 3 September 2026, 22:25

पुण्यात प्रखर बीम लाईटविरोधात न्यायालयाचा दणका! गणेश मंडळाच्या अध्यक्षाला थेट दंड आणि ‘कोर्ट उठेपर्यंत’ शिक्षा

Thursday, 3 September 2026, 21:38

बारामतीत खळबळ! तब्बल ३ हजार सिरपच्या बाटल्या आणि ६ हजार गोळ्यांचा मुदतबाह्य साठा रस्त्यावर फेकला; नागरिकांमध्ये भीती

Thursday, 3 September 2026, 20:48

यवत पोलिसांची सहजपूर येथे धडाकेबाज कारवाई! मोक्कातील सराईत गुन्हेगार २ गावठी पिस्तूल आणि १० जिवंत काडतुसांसह रंगेहात जेरबंद

Thursday, 3 September 2026, 20:11
Next Post
Amar education society's private school bus driver used abuse language to student koregaon mul pune

स्कूल व्हॅन, बसना फिटनेस प्रमाणपत्र बंधनकारक, पुणे आरटीओ अर्चना गायकवाड यांचा इशारा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp