पुणे : पेरणे फाटा येथील विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रम व नववर्षाचे स्वागत करण्याकरिता ३१ डिसेंबर रोजी पर्यटकांची होणारी गर्दी या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांना विशेष अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. त्याचबरोबर पोलिसांनी वॉक थ्रू व्हीडीओ प्रसार माध्यमांद्वारे प्रसिध्दीसाठी देण्यात आलेला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली आहे.
आगामी जयस्तंभ मानवंदना कार्यक्रमाच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाकडून माहिती पूर्ण व्हिडीओ प्रसिध्द
आगामी जयस्तंभ, पेरणेफाटा या ठिकाणी पार पडणाऱ्या मानवंदना कार्यक्रमाचे अनुषंगाने पुणे जिल्हा पोलीस दलाकडुन वॉक थ्रू Walk Through (व्हीडीओ) बनविण्यात आला असुन सदर व्हीडीओला प्रसार माध्यमांद्वारे प्रसिध्दी देण्यात आलेली आहे.
या व्हीडीओत नेमके काय आहे.
१) सदर व्हिडीओ मधुन मानवंदनेसाठी येणारे भाविकांसाठी सोयीसुविधा, वाहतुक बदल व जड वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाची माहिती देण्यात आलेली आहे..
(२) भाविकांनी कोणत्या मार्गाचा वापर करून जयस्तंभ अभिववादनासाठी पोहचायचे आहे याबाबत माहिती दिलेली आहे.
३) जड वाहतुकीकरीता कोणत्या पर्यायी मार्गाचा वापर करावा ते दाखविलेले आहे.
४) भाविकांसाठी वाहनतळ व्यवस्था व तेथुन जयस्तंभापर्यंत मानवंदनेसाठी कसे जायचे व परत कसे वाहनतळापर्यंत परत यायचे नमुद आहे.
५) जयस्तंभ मानवंदना कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दुरदर्शन व समाजमाध्यमे याद्वारे कारण्यात येणार आहे. जनसंपर्क अधिकारी, पुणे ग्रामीण,