कल्याण साबळे पाटील
Wagholi News वाघोली : वाघोली (ता. हवेली) येथे डॉक्टर असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर झाली असून, अध्यक्षपदी डॉ. भूषण विधाते यांची निवड झाली. तर उपाध्यक्षपदी डॉ. बंडू कराळे, सचिवपदी डॉ. मच्छिंद्र काशीद यांची निवड झाली. ही निवड २२३ डॉक्टर सदस्यांनी एकमताने केली आहे, अशी माहिती असोसिएशनचे संस्थापक डॉ. विनोद सातव यांनी दिली. Wagholi News
डॉक्टर असोसिएशनचे हे बारावे वर्षे असून, कार्यकारिणी आज जाहीर झाली आहे. ही कार्यकारिणी एक वर्षासाठी असणार आहे. यामध्ये वाघोली डॉक्टर्स असोसिएशनच्या नवनिर्वाचित अध्यक्षपदी केअर हॉस्पिटलचे डॉ. भूषण विधाते तर सचिवपदी डॉ. मच्छिंद्र काशिद, कोषपाल डॉ. नितीन पवार, उपाध्यक्ष डॉ. बंडू कराळे आणि डॉ. हेमंत विभुते, सहसचिव डॉ. अतुल जाधव, सहकोषपाल डॉ. राहुल शिंदे, तसेच विविध कमिटीवर विविध डॉक्टरांची निवड करण्यात आली. यावेळी डॉक्टर असोसिएशनचे आजी-माजी अध्यक्ष व पदाधिकारी यांच्यासह सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आगामी काळात अनेक कार्यक्रम घेतले जाणार
‘माझ्या कार्यकाळात डॉक्टरांची मार्गदर्शने, गेट-टु गेदर, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, डॉक्टर्स डे, सहली असे विविध कार्यक्रम घेतले जाणार आहेत’, असे नवनियुक्त अध्यक्ष डॉ. विधाते यांनी निवडीनंतर सांगितले.