केडगाव (पुणे) : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काही तरुण पिढीला मतदान करता आले नाही, परंतु आता विधानसभा निवडणुकीत तरुणाईला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी एक उत्तम संधी मिळत आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाच्या आदेशावरून जिल्हा प्रशासनाने मतदान यादी पुन्हा तयार करण्यासाठी मोहिम राबविली आहे. त्यामध्ये नवीन नाव नोंदवणे, नावामध्ये बदल करणे, मृत व्यक्तीचे नाव वगळणे, फोटो बदल करणे, पत्ता बदल करणे आदी कामे करण्यात येणार आहेत.
25 जून ते 24 जुलै या कालावधीत सदर कामे करण्यात येणार असल्याची माहिती दौंडचे उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. या एक महिन्याच्या कालावधीत केंद्र स्तरीय अधिकारी घरोघरी जाऊन मतदाराची पडताळणी करणार आहेत. 20 ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द केली जाणार आहे. येत्या तीन ते चार महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार यादी अद्यावतीकरणाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने ही मोहीम हाती घेतली आहे.
असे असेल वेळापत्रक!
1) आजपासून 24 जुलै पर्यंत मतदार नोंदणी केली जाणार आहे. त्यात काही बद्दल( नाव,फोटो,पत्ताबदलणे ,मयत व्यक्ती वगळने आदी), करणे
2) 25 जुलै प्रारूप मतदार यादी
3) 9 ऑगस्ट पर्यंत दावे हरकती दाखल करणे
4)19 ऑगस्ट पर्यंत हरकती व दावे दूर करणार
5) 20 ऑगस्ट अंतिम मतदार यादी प्रसिध्द होणार
मतदान यादी अचूक करण्यावर अधिक भर देण्यात आला आहे. त्यानुसार या वर्षी मतदान केंद्र स्तरीय अधिकारी घरोघरी जाऊन मतदाराची पडताळणी करणार आहेत. त्यासाठी दौंड तालुक्यातील सर्व नागरीकांनी मतदार यादीत आपले नाव तपासून आपले यादी भाग क्रमांकाचे बी एल ओ, तलाठी यांच्याशी संपर्क साधून फॉर्म भरून द्यावेत. सर्व राजकीय पक्षांनी सदर मोहिम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सहकार्य करावे.
– अरूण शेलार – तहसीलदार, दौंड