Voting | पुणे : राज्यातील १४७ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी आज शुक्रवारी (ता.२८) मतदान होणार आहे. आज या निवडणुकीत मतदार कोणाच्या बाजुने कौल टाकणार हे पाहणं देखील महत्वाचे ठरणार आहे. तर या निवडणुकीच्या निमित्तानं अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सर्व तयारी करण्यात आली आहे.
सर्वच राजकीय पक्षांनी बाजार समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात राजकीय नेत्यांनी ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप केल्याचे पाहायला मिळालं. दरम्यान, कुठे बाजार समितीची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे तर कुठे निवडणुकीची चुरस पाहायला मिळत आहे. बऱ्याच ठिकाणी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप आणि शिवसेना शिंदे गट असा सामना होत आहे. त्यामुळं राज्यात अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती होत आहेत.
दरम्यान, स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी आणि शिवसेना-भाजप अशी लढती होणार आहेत. तर काही ठिकाणी काही पक्ष स्वतंत्र ताकद अजमावत असल्याचे सध्याचे चित्र आहे. दरम्यान, या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मतदारांना आपलेसे करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष प्रयत्न केले. प्रचाराच्या सभा, संपर्क मोहीम यासह सर्व पद्धतीने प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सर्वच पक्षाच्या पॅनलकडून केला गेला.
३० एप्रिलला मतदारांचा कौल समजणार…
बाजार समित्यांसाठी आज (२८ एप्रिल) मतदान होणार आहे. तर रविवारी (ता.३०) मतमोजणी पार पडणार आहे. त्यामुळं ग्रामीण भागात कोणत्या पक्षाचं वर्चस्व आहे हे आपल्याला ३० एप्रिललाचं समजणार आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं राज्यातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. बऱ्याच ठिकाणी महाविकास आघाडी विरोधात भाजप आणि शिंदे गट निवडणूक लढवत आहे. तर काही ठिकाणी नेत्यांनी त्यांचे स्वतंत्र पॅनेल उभं केल्याचे चित्र दिसत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!