गणेश सुळ / दौंड : दौंड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून डॉ. वेंकादेश बाबू यांची नियुक्ती केल्याची माहिती दौंड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला यांनी दिली. त्यासोबतच दोन सहाय्यक निवडणूक खर्च निरीक्षक विकास मीना आणि मुकेश ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
निवडणूक खर्च निरीक्षक व सहाय्यक निवडणूक खर्च निरीक्षक यांचे तर्फे दौंड विधानसभा मतदारसंघातील निवडणूक खर्च विभाग, भरारी पथक, CST, FST पेड न्यूज व मीडिया मॉनिटरिंग पथकातील अधिकारी व कर्मचारी यांच्या कामकाजाची माहिती घेतली व मार्गदर्शन केले. डॉ. वेंकादेश बाबू यांचा निवास पुणे येथील व्हीव्हीआयपी विश्रामगृह येथील कक्ष क्रमांक ए 106 येथे आहे, अशी माहिती निवडणुक निर्णय अधिकारी मिनाज मुल्ला यांनी दिली.