युनूस तांबोळी
Viral | पुणे : शेती व्यवसायात भांडवला पाठोपाठ मजूरीचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. एखाद्या चेअरमन सारखे मजूरांना देखील दररोज गाडी आणायला आणि पुन्हा सोडवायला जात असते. असे चित्र ग्रामीण भागात आवर्जून पहावयास मिळते. शेती व्यवसाय करत असताना शेतातील मजूराला महत्वाचे स्थान प्राप्त झाले असून त्यांच्या मजूरीत देखील मोठी वाढ झाल्याचे पहावयास मिळते.
अशाच एका गावात मोठ्या कुटूंबात असणारी जास्त एकराची शेती होती. कुटूंब विभक्त झाल्याने शेती देखील प्रत्येकामध्ये विभागली गेली. त्यानुसार घरातील व्यक्ती मजूर म्हणून काम करण्यास कमी झाली. सावट म्हणून काम करण्याची पद्धत देखील दिवसेंदिवस कमी झाली.
यामध्ये तंत्रज्ञान विकसीत झाल्याने शेतीतील काही कामे तंत्राच्या सहाय्याने होऊ लागली आहेत. तरीही शेती व्यवसायात मजूराची अधिक मागणी वाढल्याचे दिसून येते. या कुटूंबात काम करण्यासाठी जुन्नर तालुक्यातून मजूर आणले जातात. पिकाच्या उत्पादना पर्यंत ही मजूर मंडळी वास्तव करून राहतात.
या कुटूंबात निर्व्यसनी व्यक्ती असल्याने मजूर संभाळताना त्यांची खुप कसरत होत होती. एकदा ह्या कुटूंबातील प्रमुख आळेफाटा ( ता. जुन्नर ) येथे मजूर आणण्यासाठी गेला होता. त्या मजूराचे मानधन ठरवून घेतले. त्यानंतर त्या मजूरांनी जेवनासाठी वेळ मागून घेतला. तो पर्यंत गाडी बोलावून घेण्यास सांगितले. काही वेळानंतर गाडी आणली.
या गाडीत मजूर कुटूंबातील व्यक्ती बसल्याही. मात्र त्यांच्या प्रमुख व्यक्तीची शोधाशोध सुरू झाली. या शेतकरी कुटूंबातील निर्व्यसनी असणाऱ्या व्यक्तिची तर त्रेधापिठ उडाली. कुटूंबातली प्रमुख महिला एका दुकानासमोर तिच्या पतीला मजूरांच्या प्रमुख व्यक्तीला उठवत होती. तो मात्र लोळत शिव्या देत होता. तिला तो उचलण्यास देखील कठीण होता.
ज्या दुकानासमोर ही मद्य धुंद व्यक्ती पडली होती. तो दुकानदार त्या महिलेला रागवून सांगत होता. त्याला येथून लवकर घेऊन जा. कशाला अशा माणसाला कामाला नेतात लोक. त्यावेळी त्या शेतकरी कुटूंबातील प्रमुख व्यक्ती म्हणाली…अहो, कामाला लय चांगला हाय. पण दारू पिला की पार कामातून जातोय. त्यावर दुकानदार म्हणाला, मग गाढवाला काय गोपाळशेट म्हणाव का ? यावर तेथे जमलेल्या लोकांमध्ये चांगलाच हशा पिकला होता.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Shirur News | पंधरा वित्त आयोगातील मंजूर कामे पुर्ण न झाल्याने उपोषणाचा इशारा