पुणे : पुण्यात गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. भोर तालुक्यातील पसुरे गावात कुंपण टाकण्याच्या वादातून निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने ग्रामस्थांवर गोळीबार केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. लष्करी अधिकाऱ्याने गोळीबार केल्याचे चित्रफीत समाजमाध्यमातून प्रसारित करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, भोर तालुक्यातील पसुरे गावात एका सेवानिवृत्त लष्करी अधिकाऱ्याचे बंगला (फार्म हाऊस) आहे. लष्करी अधिकारी वाकड भागात राहायला आहे. बंगल्याच्या परिसरात खांब, तसेच कुंपण बांधण्यावरुन लष्करी अधिकाऱ्याचा पसुरे येथील ग्रामस्थांशी वाद झाला.
त्यानंतर अधिकाऱ्याने त्याच्याकडील बंदुकीतून हवेत दोन गोळ्या झाडल्या. तसेच ग्रामस्थांना धमकावले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. अधिकाऱ्याने हवेत गोळीबार केल्याचे चित्रीकरण ग्रामस्थांनी मोबाइलवर केली असून समाजमाध्यमात प्रसारित झाली आहे.