पुणे : बारामती लोकसभा निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिले आहे. अशातच आता बारामती लोकसभा निवडणुकीत नवा ट्विस्ट पहिला मिळणार आहे. अजित पवार यांनी प्रतिष्ठेचा मुद्दा केला असतानाच आता शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभेला अपक्ष उतरणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्या संदर्भात एकमताने ठराव मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे बारामती लोकसभेला आता तिरंगी लढत होण्याची चिन्हे दिसत आहेत.
माजी आमदार विजय शिवतारे यांनी आज १३ मार्च रोजी सासवडमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती. या बैठकीत शिवतारे यांच्या उमेदवारीचा ठराव एक मताने मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे विजय शिवतारे बारामती लोकसभेची निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे सांगतिले आहे.
पुढे बोलताना म्हणाले की, सव्वा तास बैठक चालली आणि एकमताने ठराव मंजूर करण्यात आला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ हा काय कोणाचा सातबारा नाही. मी देशातील 543 मतदारसंघापैकी एक लोकसभेच्या मतदारसंघ आणि मालकी कोणाची नाही. सहा विधानसभेचे मतदारसंघ आहेत. आपला स्वाभिमान जागृत होऊन आपण लढलं पाहिजे.
विशेषतः अजित पवार 2019 च्या निवडणुकीमध्ये मी जरी त्यांच्या मुलाविरुद्ध प्रचार केला होता तो राजकारणाचा एक भाग होता आणि माझं कर्तव्य म्हणून केला होता. वैयक्तिक काही नव्हतं. परंतु, अजित पवार यांनी नीच पातळी ओलांडूनही मी माफ केलं . त्यांचा सत्कार देखील केला. तरीही त्यांची गुर्मी तशीच होती, अशी टीका विजय शिवतारे यांनी केली आहे.