पुणे: पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर अत्याचार झालेल्या २६ वर्षीय तरुणीला राज्याच्या ‘मनोधैर्य’ योजनेअंतर्गत ३ लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी स्वारगेट बस स्थानकावर शिवशाही बसमध्ये एका पुरूषाने पीडितेवर बलात्कार केला होता. आरोपीला अटक करण्यात आली आणि १२ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
गुन्ह्यातील पीडितेला त्यांच्या मानसिक आणि सामाजिक पुनर्वसनासाठी आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने ‘मनोधैर्य’ योजनेअंतर्गत आर्थिक मदत मंजूर केली आहे. ही रक्कम लवकरच पिडीतेला लवकरच देण्यात येणार आहे.
या घटनेमुळे शहरात व्यापक संताप व्यक्त करण्यात आला होता. पीडितेचे कुटुंब या घटनेचा सामना करण्यासाठी संघर्ष करत आहे. ‘मनोधैर्य’ योजनेअंतर्गत पीडितांना त्यांच्या त्रासातून सावरण्यासाठी आर्थिक मदत, समुपदेशन आणि इतर प्रकारची मदत प्रदान करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.