पुणे : पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे हे नेहमीच त्यांच्या दबंग कामगिरीमुळे सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात. तसेच सामाजिक कार्यातही ते नेहमी आघाडीवर असतात. त्यांच्या मनसे स्टाईलने अनेक गोर-गरीब जनतेची कामे वसंत मोरे यांनी मार्गी लावली आहेत. पुण्यातच नव्हे तर राज्यभरात वसंत मोरे यांचे हजारो चाहते आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते अनेकांच्या संपर्कात असतात.(Vasant More)
अशातच आता वसंत मोरे यांनी पुन्हा एकादा सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये थेट पुणे पोलिसांना आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनाच इशारा दिला आहे. आमची पोरं फटाके विकत आहेत, गांजा नाही…आमची दिवाळी नीट झाली नाही तर तुमचा रोज शिमगा होईल…असा थेट इशारा दिला आहे. पुन्हा एकदा वसंत मोरे यांची फेसबुक पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे. (Vasant More)
काय आहे नेमकं त्या पोस्टमध्ये?
आयका ना साहेब…. (अतिक्रमणवाले आणि पोलिस), दिवाळी वर्षातून एकदाच येती ओ…, असं भावनिक भाष्य करत पोस्ट लिहिली आहे.
कोरोनामुळे मोडलेल कंबरडे आजुन नीट झाले नाही. राज्य सरकार अस्थिर असल्यामुळे कोणाचाच कोणाला मागमूस लागत नाहीये…,
सामान्य जनतेकडे कोणाचेच लक्ष नाही…तरुण पिढी भरकटत चालली आहे हाताला पैसा मिळाना, दिवाळीतले चार दिवस आमची तरुण पोरं रस्त्याच्या कडेला कोणाला अडचण होणार नाही याची काळजी घेऊन फटाकड्याचे स्टॉल लावून बसलेले आहेत ते पण व्याजाने पैसे आणून…असे ते म्हणाले.
पुढे बोलताना म्हणाले, मागच्या दोन दिवसापासून रोज ऐकतोय…,अतिक्रमण वाले एवढे मागतात…पोलीस तेवढे मागतात…ट्रॅफिक वाले एवढे मागतात… अरे आमची पोर फटाकडे विकत आहेत गांजा नाही…आज तर एका पोलिस महाशयांनी कमालच केली… एक पोरग त्यांना म्हटलं वसंत (तात्या) मोरे संग बोला… तर साहेब बोलले की ही त्यांची हद्द आहे का ?
माझी हद्द ठरवायचा तुम्हाला अधिकार कोणी दिला?
तेव्हा साहेब हात जोडून विनंती आहे…पोरांना धंदे करू द्या… त्यांची दिवाळी ४ दिवसांचीच आहे… तुमची दिवाळी उरलेले ३६१ दिवस चालते…आमची दिवाळी नीट झाली नाही तर तुमचा रोज शिमगा होईल… तेव्हा उगाच हद्दीच्या भानगडीत पडू नका…नाहीतर एका दिवसात सगळे लाईव्ह घेऊन कोणी किती घेतले ते जाहीरपणे सांगावे लागेल…
जय हिंद… जय महाराष्ट्र… जय मनसे…