Vande Bharat Express : पुणे : भारतीय रेल्वेची सर्वात आधुनिक आणि वेगवान गाड्या म्हणून यांचा उल्लेख होत आहे. मात्र, वंदे भारतचे तिकीट दर जास्त असल्याने रेल्वे प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तसेच वंदे भारतचे तिकीट हे विमानापेक्षा महाग असल्याने रेल्वे मंत्रालय ट्रोल होत आहे. त्यामुळे आता तिकीट दराबाबत फेर आढावा घेण्यात येणार आहे.(Vande Bharat Express)
तिकीट दराबाबत फेर आढावा घेण्यात येणार आहे.
मुंबईतून गोव्याला विमानाने प्रवास करायचा असेल तर वंदे भारत एक्स्प्रेसच्या तिकिटापेक्षा कमी खर्चात होतो आणि वेळेचेही बचत होते. वंदे भारतचे तिकीट हे विमानापेक्षा महाग असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. महाराष्ट्रात मुंबई – गोवा, मुंबई – शिर्डी आणि मुंबई – सोलापूर मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत. मात्र, या गाडीचे तिकीट दर जास्त आहे. तसेच देशातील वंदे भारत एक्स्प्रेसचे दर जास्त असल्याने रेल्वे मंत्रालय ट्रोल होत आहे.(Vande Bharat Express)
आता वंदे भारत ट्रेनच्या भाड्याचा आढावा घेण्यात येणार असून व्यावहारिक बनवण्याची तयारी रेल्वेने सुरु केली आहे. सातत्याने ट्रोल झाल्यानंतर रेल्वे मंत्रालयाने कारवाई करण्याबाबत मोठे पाऊल उचलले आहे. प्रथम दिल्ली-डेहराडून इत्यादी लहान मार्गांचा आढावा घेतला जाईल. आणि त्यानंतर इतर मार्गांचा विचार केला जाईल, असे रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे. त्यामुळे भविष्यात वंदे भारतचे तिकीट दर कमी होऊन प्रवाशांना मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे. तसे संकेत रेल्वे मंत्रालयाने दिले आहेत.(Vande Bharat Express)
वंदे भारत एक्स्प्रेसने गोव्याला जाण्याचे मुंबईकरांचे स्वप्न पूर्ण झाले तरी तिकीट दर जास्त असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोव्यातील मडगावपर्यंतची वंदे भारत एक्स्प्रेस २७ जूनपासून सुरु झाली आहे. मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस ही आठवड्यातून फक्त ३ दिवस धावणार आहे. ८ डबे असलेली ही रेल्वे पावसाळ्यात स्पीड ५७ किलो मीटर प्रती तास वेगाने धावणार आहे. गाडीचे एक्झुकेटीव्ह तिकीट हे ३,५३५ आहे. सुमारे दहा तासांमध्ये ही रेल्वे मुंबईहून मडगावला जाणार आहे. तर याच मार्गावरील विमानाचे तिकीट २, २०० रुपये आहे.(Vande Bharat Express)