Vande Bharat | पुणे : मोठ्या थाटा माटात सुरु झालेल्या वंदे भारत रेल्वे गाडीला प्रवाशांनी चांगलेच डोक्यावर घेतले असल्याचे दिसून येत आहे. अवघ्या 32 दिवसात मुंबई-सोलापूर वंदे भारत रेल्वेला सुरुवात झाले आहेत. प्रवाशांच्या प्रचंड प्रतिसाद ही रेल्वे सुसाट धावत असून तब्बल ४.३ कोटी रुपयांची कमाई केली आहे. ही माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
ही रेल्वे गाडी मुंबईहून पुणेमार्गे सोलापूरला आणि परत मुंबईला दररोज धावते. रेल्वे नं. २२२२५ मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्निनस, दादर, कल्याण, पुणे, कुर्डुवाडी मार्गे सोलापूरला जाते.
३२ दिवसांमध्ये २६ हजार २८ प्रवाशांनी केला प्रवास…
मागील ३२ दिवसांमध्ये २६ हजार २८ प्रवाशांनी प्रवास केला. रेल्वेला २.०७ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. रेल्वे नं. २२२२६ सोलापूर – मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसने २७ हजार ५२० प्रवाशांनी प्रवास केला. यातून रेल्वेला २.२३ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला.
वंदे भारतीच वैशिष्ट्ये –
– वंदे भारत रेल्वेत एकावेळी १ हजार १२८ प्रवासी प्रवास करतात.
– १ हजार २४ चेअर कार आणि १०४ एक्झिक्युटिव्ह चेअर कारची प्रवासी वाहून नेण्याची क्षमता
– ऑन-बोर्ड वाय-फाय इन्फोटेनमेंट, जीपीएस आधारित प्रवासी माहिती प्रणाली
– प्लश इंटिरियर्स, टच फ्री सुविधांसह बायो-व्हॅक्यूम टॉयलेट्स, डिफ्यूज्ड एलईडी लाइटिंग
– प्रत्येक सीटच्या खाली चार्जिंग पॉइंट्स, वैयक्तिक टच-आधारित वाचन दिवे यासारख्या उत्कृष्ट प्रवासी सुविधा
– मुंबई-सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस ही देशातील ९ वी वंदे भारत रेल्वे आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!