पुणे, ता. ३० : ‘वंदे भारत’ या ट्रेनच्या धर्तीवर रेल्वे बोर्डाने ‘वंदे साधारण एक्स्प्रेस’ सुरु करण्याची तयारी केली आहे. कारण, सध्या ‘वंदे भारत’ या ट्रेनचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. त्यामुळेच सर्वसामान्य प्रवाशांसाठी रेल्वेकडून ‘वंदे साधारण एक्स्प्रेस’ सुरु करण्यात येत आहे. पण ही ट्रेन पुण्यातून जाणार किंवा येणार नसल्याने प्रवाशांचा पुरता हिरमोड झाला आहे.
‘वंदे साधारण एक्स्प्रेस’साठी पहिल्या टप्प्यात पाच मार्गांची निवड केली आहे. तर १८ मार्ग प्रस्तावित आहेत. मात्र, यातील कोणत्याही योजनेत पुण्याचा समावेश नाही. पुण्याहून दरभंगा, हावडा, गोरखपूर आदी शहरांना जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात पुण्याहून ‘वंदे साधारण एक्स्प्रेस’ सुरू होण्यासाठी रेल्वे प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, अशी प्रवाशांची अपेक्षा आहे.
चेन्नईत तयार झाली ट्रेन
‘वंदे साधारण एक्स्प्रेस’ ही चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीत तयार करण्यात आली. तेथून पहिला रेक मुंबईत दाखल झाला. लवकरच त्याची चाचणी होणार आहे. ही ट्रेन 22 डब्यांची असणार आहे. या रेल्वेच्या निर्मितीसाठी सुमारे ६५ कोटी रुपये इतका खर्च आला.
सर्वसामान्य प्रवाशांसाठी ट्रेन फायदेशीर
सर्वसामान्य प्रवाशांच्या आवाक्याबाहेर ‘वंदे भारत एक्स्प्रेस’चे तिकीट दर आहेत. त्यामुळे त्यास प्रतिसादही कमी मिळत आहे. या पार्श्वभूमीवर सामान्य प्रवाशांना डोळ्यांसमोर ठेवून या रेल्वेची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे तुलनेने कमी दरा