गणेश सुळ
Daund News : केडगाव, (दौंड) : दौंड तालुक्यातील पंचायत समित्या, जिल्हा परिषद, नगर परिषद, विधानसभा, लोकसभेच्या निवडणुकीत रणधुमाळी सुरू होण्यापूर्वी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या पंचवार्षिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर रणनिती आखली जाणार आहे. (Daund News)
दौंड तालुक्यातील गणेश हॉल या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष राजकुमार यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा उपाध्यक्ष सतीश साळवे, दौंड तालुका वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अश्विन वाघमारे, शहराध्यक्ष सैफभाई मनियार, मंगलदास निकाळजे, राहुल नायडू, अजिंक्य गायकवाड, अक्षय शिखरे, टोनी आदर्श, संतोष कांबळे, शहर व ग्रामीण भागातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते. (Daund News)
यावेळी जिल्हाध्यक्ष राजकुमार यांनी शहर व दौंड तालुक्याचा आढावा घेऊन उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले, या आढावा बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली. दौंड तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडीमध्ये शहर व ग्रामीण भागात पक्ष बांधणी संदर्भात सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येणार असल्याचा ठराव करण्यात आला.
दम्यान, महाराष्ट्र राज्यात व देशात विविध ठिकाणी होत असलेल्या दलित हत्याकांड प्रकरणी, पक्षाच्या वतीने लढा उभारण्याचा इशारा देण्यात आला असून सध्या मुस्लिम समाज बांधवांनवर जो अंन्याय अत्याचार वाढत चालले आहेत. त्यामुळे देश व राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडत चालली आहे. या पार्श्वभूमीवर अन्यायाविरुद्ध आवाज उठवला जाईल अशी भुमिका पक्षाच्या वतीने घेण्यात येणार आहे.