पुणे : वंचित बहुजन आघाडीने मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघांतील आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली. त्यानुसार मावळमधून माधवी जोशी तर अन्वर मकबुल शेख यांना शिरूर येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. वंचितने ही यादी ‘एक्स’ या समाजमाध्यमावरून जारी केली. माधवी जोशी यांनी वंचित बहुजन आघडीचे राज्य उपाध्यक्ष तथा मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांच्या उपस्थितीत शनिवारीच वंचितमध्ये प्रवेश केला. पक्षात प्रवेश करताच जोशी यांना लगेचच उमेदवारी देण्यात आली. शिरूरमधून शेख यांना उमेदवारी देऊन वचितने निवडणुकीत रंगत आणली आहे.
वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली.#VBAForIndia pic.twitter.com/NRofr4vlbl
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) April 20, 2024