हनुमंत चिकणे
Uruli Kanchan : उरुळी कांचन, (पुणे) : कांद्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यातले पाणी थांबण्याचे नाव घेत नसतानाच
कोथिंबिरीचे भाव घसरल्याने भवरापूर (ता. हवेली) ( urulikanchan)येथील प्रगतशील शेतकऱ्याने दोन एकरातील कोथिंबीर पिकावर रोटावेटर फिरवून पीक मोडीत काढल्याचे समोर आले आहे.
कोथिंबिरीचे दर घसरल्यामुळे निर्णय…
शरद काळूराम चौधरी असे त्या शेतकऱ्यांचे नाव असून त्यांनी कोथिंबिरीचे दर घसरल्यामुळे लागवडीसाठी झालेला खर्चही निघणे मुश्किल झाल्याने किमान शेतात खत होईल, या उद्देशाने कोथिंबीरीच्या पिकावर रोटावेटर फिरवला.
अतिवृष्टीमुळे उसाचे उत्पन्न घटल्यामुळे त्यांनी तो खोडा ऊस मोडल्यानंतर कोथिंबिरीची निवड केली. कोथिंबिरीचे भाव गगनाला भिडल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी कोथिंबीर पीक घेतले. कोथिंबीर पिक घेण्यासाठी शेताची नांगरणी, मशागत करून कमी दिवसात जास्त उत्पन्न मिळेल म्हणून धने पेरले. सुरुवातीला ४ हजार रुपये किमतीचे दोन पोते रासायनिक खत शेतात टाकले.
कोथिंबीर आल्यानंतर दोन एकर कोथिंबीर ही व्यापाऱ्याला पन्नास हजार रुपयांना दिली. मात्र कांद्याचे जसे बाजार पडले तसेच कोथिंबीरची अवस्था झाली. व्यापारी येईल या अशाने वाट पाहिली, परंतु व्यापारी काय आलाच नाही. मग थेट शेतात नांगर घालून कोथिंबीर जागेवर शेतात काढून टाकली. झालेला खर्चही वसूल झाला नाही.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून भाजीपाला पिकांच्या दराची दिवसागणिक होणारी घसरण होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत.
सामाजिक कार्यकर्ते धनंजय टिळेकर म्हणाले, पूर्व हवेलीत सध्याला कोणत्याच मालाला बाजार भाव नसल्यामुळे अतिशय बिकट अवस्था शेतकऱ्यांचे आहे. याच्यामध्ये व्यापाऱ्यांची चांदी आणि शेतकऱ्यांचे हाल हे पुन्हा एकदा यातून स्पष्ट झाले आहे.”
याबाबत बोलताना शेतकरी शरद चौधरीम्हणाले, “कोथिंबिरीला भाव आहे, म्हणून दोन एकरांत कोथिंबिरीचे पीक घेतले. पिक जोमदार आणून त्याला ५० ते ६० हजार रुपये खर्च केला होता. तरीही एका व्यापाऱ्याला ५० हजार रुपयांना दोन एकर कोथिंबीर दिली होती. मात्र त्यानेही नंतर घेऊन जाण्यस नकार दिल्यामुळे हे पीक मोडीत काढले. व उभ्या कोथिंबीर पिकावर रोटावेटर फिरवला.”
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
नायगाव येथील शेतकरी कुटुंबातील मुलगा बनला पोलीस उपनिरीक्षक
राज्यातील पोल्ट्री शेतकरी संघटनेची बैठक सलग दुसऱ्यांदा रद्द ; तर पोल्ट्री शेतकरी वर्ग त्रस्त